पहिला विजयोदूर्गोत्सव गुहागरच्या गोपाळगडवर

gopalgad.jpg
gopalgad.jpg

पुणे : ''शिवशाहीतील अभेद्य आरमारचा अविभाज्य भाग असलेल्या गोपाळगडावर तब्बल ३५० वर्षांनंतर १८ आॅक्टोबरला दसरा साजरा करण्यात येत आहे. या पहिल्या विजयोदूर्गोत्सव करिता शिवप्रेमींनी गुहागरच्या गोपाळगडला यावे,'' असे आवाहन शिवप्रेमींनी केले आहे.

गुहागर नागरिक अक्षय पवार, पंकज शोभा दळवी आणि दुर्गवीर प्रतिष्ठानचे कार्यकर्ते एकत्रितपणे गोपाळगडावर दसरा साजरा करणार आहेत. पुरातन वास्तूची परझड होताना प्रशासनाने डोळे झाकून घेतले आहेत. असा गोपाळगड वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या तरुणांनी दसऱ्याच्या निमित्ताने पुन्हा गोपाळगडला जुने वैभव कायम मिळावे, किल्ला संरक्षणासाठी शिवप्रेमींनी एकत्र यावे या उद्देशाने दसरोत्सवाचे आयोजन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com