स्वारगेट चौकातील वाहतूक कोंडी रोखण्यास उड्डाणपूलही असमर्थ

शहराच्या मध्यवर्ती भाग असणाऱ्या स्वारगेट चौकाला गर्दीने व्यापले आहे. कायमच या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात.
Swargate Chowk
Swargate ChowkSakal
Summary

शहराच्या मध्यवर्ती भाग असणाऱ्या स्वारगेट चौकाला गर्दीने व्यापले आहे. कायमच या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात.

स्वारगेट - शहराच्या मध्यवर्ती भाग असणाऱ्या स्वारगेट चौकाला गर्दीने व्यापले आहे. कायमच या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात विशेषतः बसस्थानकात जाण्यासाठी एसटीची रांग लागलेली असते, त्याचबरोबर कात्रजकडे जाणारी वाहनेही रांगेत मोठ्या प्रमाणात उभी असतात. सकाळी नऊ ते रात्री दहा वाजेपर्यंत अखंडपणे ही गर्दी असते. त्यामुळे स्वारगेट चौक ओलांडने हे जिकरीचे होऊन बसले आहे. शेकडो कोटी रुपये खर्चूनही बांधलेल्या उड्डाणपूल ही कमी पडत असल्याने त्याचबरोबर मेट्रोची कामे चालू असल्याने वाहतूक कोंडीत आणखी भर पडत आहे.

हा चौक शहराचा मध्यभाग असल्याने व या चौकातून लाखो वाहनांची ये-जा होत असते. शिवाजी रस्ता, टिळक रस्ता, कात्रज रस्ता, हडपसर रस्ता, सिंहगड रस्ता यांच्या मध्यभागी हा चौक येतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणत वाहनांची या चौकातून वर्दळ असते. त्याचबरोबर जवळच प्रसिद्ध व्यापारी पेठा, प्रशासकीय इमारती, स्वारगेट बस स्थानक, शिक्षण संस्था असल्याने सहजकीच नागरिकांची मोठ्या प्रमाणात या भागात ये-जा असते. त्यामुळेही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्यास मदत होते.

त्याच बरोबर या चौकात मेट्रोचे काम सुरू असल्याने लावलेल्या बॅरिकेट्स मुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांना येथून मार्गक्रमण करताना कसरत करावी लागते, त्यातच बेशिस्त रिक्षाचालकांमुळे नागरिकांना मनस्तापाला सामोरे जावे लागते. भाडे मिळवण्यासाठी स्वारगेट चौकात साधारणतः तीनशेच्या आसपास रिक्षा उभ्या असतात. एकाच ठिकाणी रिक्षा मोठ्या प्रमाणात गोळा होतात, त्यामुळे सर्व शहराच्या मध्यवर्ती भागातील स्वारगेट चौक कायमच राहदरीने व्यापला जातो.

का वाहतूक कोंडी होते

* मोठ्या प्रमाणात खाजगी ट्रॅव्हल्स भर चौकात उभ्या असतात

* स्वारगेट बस स्थानकाचे योग्य व्यवस्थापन नाही

* खाजगी रिक्षाचालकांची संख्या मोठ्या प्रमाणात

* खाजगी वाहनांची वाढलेली संख्या बेसुमार

* पोलीस प्रशासनाचे वाहतूक नियोजनत अपयश

* मेट्रोची कामे सुरू

वाहतूक विभाग आणि आम्हीही यात लक्ष देण्याचे ठरवले आहे. यावर आम्ही अभ्यास करीत आहोत. जे जे घटक वाहतूक कोंडीसाठी कारणीभूत ठरत आहेत त्यांच्याशी चर्चा करून आम्ही हा प्रश्न सोडवणार आहोत.

- अशोक इंदलकर (स्वारगेट पोलीस स्थानक वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक)

स्वारगेट बस स्थानकाला आत येण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी दोन दरवाजे आहेत. आत येणाऱ्या जागेत मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे रस्ता अर्धाच झाला आहे. म्हणून बसेस वाहतूक कोंडीत मोठ्या प्रमाणात अडकलेले असतात. त्याचबरोबर खाजगी वाहनांची संख्याही वाढली असल्यामुळे स्वारगेट चौक कायमच वाहतूक कोंडीत अडकलेला असतो.

- सचिन शिंदे (व्यवस्थापक, स्वारगेट आगार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com