पावसासोबत बरसला मैत्रीचा रंग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 ऑगस्ट 2016

पुणे - 

मैत्री एक अलगद स्पर्श मनाचा, 
मैत्री एक अनमोल भेट जीवनाची, 
मैत्री एक अतूट सोबत आयुष्याची 

... अशा शब्दांनी ट्विटर, व्हॉट्‌सऍप, हाईक आणि फेसबुक वॉलवर मैत्रीचे नाते गुंफत... कविता, चारोळ्या, छायाचित्रे, व्हिडिओ शेअर करत... मैत्रीचे नाते घट्ट बांधणारे "फ्रेंडशिप बॅंड‘ देत तरुणांनी एकमेकांना मैत्री दिनाच्या शुभेच्छा दिल्या, तर काहींनी पावसात फिरायला जाण्याचे निमित्त साधत हा दिवस "सेलिब्रेट‘ केला. 

पुणे - 

मैत्री एक अलगद स्पर्श मनाचा, 
मैत्री एक अनमोल भेट जीवनाची, 
मैत्री एक अतूट सोबत आयुष्याची 

... अशा शब्दांनी ट्विटर, व्हॉट्‌सऍप, हाईक आणि फेसबुक वॉलवर मैत्रीचे नाते गुंफत... कविता, चारोळ्या, छायाचित्रे, व्हिडिओ शेअर करत... मैत्रीचे नाते घट्ट बांधणारे "फ्रेंडशिप बॅंड‘ देत तरुणांनी एकमेकांना मैत्री दिनाच्या शुभेच्छा दिल्या, तर काहींनी पावसात फिरायला जाण्याचे निमित्त साधत हा दिवस "सेलिब्रेट‘ केला. 

सोशल नेटवर्किंग साइट्‌सवर सकाळपासूनच मैत्री दिनाच्या "पोस्ट‘चा पाऊस पडत होता. मित्र-मैत्रिणींनी शेअर केलेल्या प्रत्येक पोस्टला भरपूर लाइक्‍सही मिळाल्या. ज्यांना जुन्या मित्रांना भेटता आले नाही, त्यांनी फेसबुक आणि व्हॉट्‌सऍपद्वारे एकमेकांना शुभेच्छा दिल्या. फ्रेंडशिप बॅंड, भेटवस्तू, एसएमएस, अगदी प्रत्यक्ष भेट घेऊन काहींनी एकमेकांना "विश‘ केले. कोणी कट्ट्यावर जमून, तर कोणी बागेत जाऊन हा दिवस साजरा केला. काहींनी सोबत चित्रपट पाहून जुन्या आठवणी जागवल्या, तर काहींनी सामाजिक बांधिलकी जपत गरजू लोकांना मदत केली. 

शहराच्या मध्यवर्ती भागासह फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता, कॅम्प परिसर तरुणाईने गजबजून गेला होता. महाविद्यालयाच्या आवारात सुटी असतानाही तरुण-तरुणींनी गर्दी केली. नव्यानेच महाविद्यालयात दाखल झालेल्यांनीही एकमेकांना मैत्रीचे बॅंड बांधले. हॉटेल्समध्ये जाऊन अनेकांनी पार्टी करत आजचा दिवस "सेलिब्रेट‘ केला. यानिमित्ताने काहींनी बुके आणि गुलाबपुष्प देऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या, तर काहींनी बॅंड, ब्रेसलेट, रिंग्ज, पर्स, टेडी बेअर, शुभेच्छापत्रे देऊन काहींनी मित्रांना शुभेच्छा दिल्या. तरुणांबरोबरच अनेक ज्येष्ठ नागरिकांनीही एकत्र जमून आठवणींना उजाळा देत मैत्री दिन साजरा केला. "हर एक फ्रेंड जरुरी होता है‘ असे म्हणत जल्लोष करणारी तरुणाईही पाहायला मिळाली. 

टॅग्स