दाऱ्याघाट-आंबोलीला तालुक्यातील पहिला उपद्रव शुल्क नाका सुरू

frist updrav shulk naka started at daryagha amboli
frist updrav shulk naka started at daryagha amboli

जुन्नर- आंबोली ग्रामस्थ व वन विभाग जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने  दाऱ्याघाट-आंबोली येथे तालुक्यातील पहिला उपद्रव शुल्क नाका आज शनिवार ता.30 रोजी सुरू करण्यात आला आहे. निसर्गरम्य आंबोली गाव आणि दाऱ्याघाट परिसरात पावसाळ्यात पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतात. घाट, डोंगर दऱ्या, आणि धबधबे पाहण्याचा आनंद मनमुराद लुटत असतात. या पर्यटकांना जबाबदारीने पर्यटन करता यावे व त्यांना विविध सोयीसुविधा उपलब्ध होण्यासाठी ग्रामस्थ आणि वनहक्क समिती, आंबोली यांनी कटिबद्ध होत या उपक्रमाचे नियोजन केले आहे.

पर्यटनासाठी या परिसरात येणाऱ्या पर्यटकांकडून माफक प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे. पर्यटकांकडून प्राप्त होणाऱ्या निधीमधून पर्यटकांसाठी विविध सोयीसुविधा देणे, परिसर स्वच्छता राखणे आदी कामे करण्यात येणार आहेत. यावेळी जुन्नरचे सहाय्यक उपवनसंरक्षक मोहिते म्हणाले, येथे येणाऱ्या पर्यटकानी सर्व नियमाचे पालन करावे. याप्रसंगी भरत राऊत, अशोक लांडे, काळू शेळकंदे , नाथा शिंगाडे, सुभाष कोचिक, सरपंच पुष्पाताई कोरडे तसेच आंबोलीच्या सरपंच दिपाली दाते, उपसरपंच सखाराम काठे, वनहक्क समिती अध्यक्ष मनोहर मोहरे, वनरक्षक सोनवणे, अविनाश ढोबळे, ग्रामपंचायत सदस्य शांताराम भालचिम, नामाबाई अरुण मोहरे व शांताबाई भालचिम आणि बेबी भालचिम आदीं मान्यवर उपस्थित होते. यावेळी, सूत्रसंचालन सुभाष मोहरे यांनी केले, देवराम भालचिम यांनी आभार मानले. सोबत फोटो

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com