तंदुरुस्तीसाठी गॅजेट्‌स

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 मे 2017

पुणे - हिंजवडी येथील एका प्रसिद्ध आयटी कंपनीमध्ये काम करणाऱ्या स्वप्नीलच्या फेसबुक आणि ट्‌विटर टाइमलाइनवर रोज ‘अपडेट’ दिसत होते. तो किती चालला, पळाला, त्याच्या किती ‘कॅलरी बर्न’ झाल्या हे एका इमेजच्या स्वरूपात त्याच्या फॉलोव्हर व फ्रेंडलिस्टमधील हजारो लोक रोज बघत. तंदुरुस्तीबाबत जागरूक असलेले शेकडो तरुण, ज्येष्ठ नागरिक स्वप्नीलप्रमाणे तंत्रज्ञानाचा वापर दैनंदिन जीवनात करत आहेत.  

बदलत्या जीवनशैलीमुळे आणि नवनवीन तंत्रज्ञानामुळेही बैठ्या कामाचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे आपण दिवसभरात किती चालतो किंवा आपल्या आहाराच्या तुलनेत किती व्यायाम करतो, याचे कोणत्याही प्रकारे मोजमाप करणे शक्‍य होत नाही. त्यामुळे घड्याळासारखे हातावर बांधता येतील, अशी गॅजेट्‌स आता आपल्या तंदुरुस्तीची काळजी घेण्यासाठी सज्ज झाली आहेत.

‘ट्रॅकर’ पद्धतीची ही उपकरणे एकदा सकाळी घातली की, दिवसभरात आपण किती पावले चाललो याचीही ‘रिअल-टाइम’ माहिती आपल्याला दिसत राहते. 

‘‘ट्रॅकर घातल्यामुळे दिवसभरात किती हालचाल झाली आणि व्यायामाची कितपत गरज आहे, याची लगेच जाणीव होते. मी सुरवातीला रोज ट्रॅकरची माहिती बघून अधिकाधिक हालचाल करण्याचा प्रयत्न करत होतो,’’ असे मंजिरी कुलकर्णी यांनी सांगितले.

पुणे

पुणे  - शहरातील सर्व क्षेत्रीय कार्यालये, तसेच जिल्ह्यात मंडलस्तरावर आधार नोंदणी केंद्र सुरू करण्याची प्रक्रिया अंतिम...

02.33 AM

पिंपरी - गुरुवारपासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील वातावरण उत्सवमय झाले आहे. घराघरात घट बसविण्याची तसेच...

02.30 AM

पुणे -  ""वयाच्या 25 वर्षांपर्यंत मी कधीही रुग्णालयाची पायरी चढले नाही; पण अचानकच मला आजार झाला. डॉक्‍टरांच्या तपासणीत...

02.30 AM