शहरात रस्त्यांना उत्सवी स्वरूप 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

पुणे - मानाच्या गणपतीच्या दर्शनासह सार्वजनिक गणेश मंडळांनी सादर केलेले देखावे पाहण्यासाठी उत्सवाच्या आठव्या दिवशी म्हणजे, शुक्रवारी रात्री शहरभर गणेशभक्तांची गर्दी पाहायला मिळाली. घरचा बाप्पा, गौरीचे विसर्जन झाल्याने महिलांसह ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले देखावे पाहण्यासाठी आवर्जून घराबाहेर पडले होते. मध्यवर्ती भागासह टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, केळकर रस्त्यांना शुक्रवारी रात्री खऱ्या अर्थाने "उत्सवी' स्वरूप आले होते. 

उत्सवाच्या सातव्या दिवशी (गुरुवारी) घरच्या गणपतीचे विसर्जन झाल्याने शुक्रवारी सायंकाळपासूनच देखावे पाहण्यासाठी गर्दी होती. सायंकाळी पावणेसातच्या सुमारास दहा ते पंधरा मिनिटे पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतरही भक्तांचा उत्साह कायम असल्याचे जाणवले. मानाच्या गणपतीचे दर्शन करण्याबरोबरच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने सादर केलेला देखावा पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होती. देखावा आणि आजूबाजूच्या परिसरात उभे राहून अनेकजण "सेल्फी'चा आनंद घेत होते. गर्दी बाजूला सारत, कुटुंबीयांसमवेत छायाचित्र आणि "सेल्फी' काढण्याची लगबगही दिसून आली.