वडकीतील तलावात विसर्जनावेळी दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 सप्टेंबर 2017

पाण्याचा अंदाज न आल्याने पाच मुले पाण्यामध्ये पडली होती. रोहित व ओंकार यांची आईने व बरोबरीच्या महिलेने त्यांना वाचविण्यासाठी पाण्यात उडी मारली.

कोंढवा : पुणे सासवड रस्त्यालगत असणाऱ्या वडकीनाला येथील उमाजी नाईक तलावांमध्ये दोन सख्ख्या भावंडांचा पाण्यामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गणपती विसर्जनासाठी तलावांमधील पाण्यात गेले असता अंदाज न आल्याने पाच मुले बुडाली होती. तत्काळ दोन महिलांनी मुलांना वाचविण्यासाठी पाण्यात उडी मारली. स्थानिक नागरिकांनी तीन मुलांना व महिलांना वाचवले मात्र दोघाचा मृत्यू झाला.

रोहित सतीश जगताप ( वय 13) व ओंकार सतीश जगताप (वय 9) (वडकी, 10 वा मेैल ) अशी मृत मुलांची त्यांची नावे आहेत. रोहित इयत्ता 7 वी मधे व ओंकार 5 वी इयत्ते मधे शिकत होते. मंगळवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास परिसरातील मुले वडकीनाला येथून कानिफनाथगडाकडे जाणाऱ्या मार्गावर कानिफनाथ पायथ्याला असणाऱ्या उमाजी नाईक तलावात गणपती विसर्जनासाठी गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने पाच मुले पाण्यामध्ये पडली होती. रोहित व ओंकार यांची आईने व बरोबरीच्या महिलेने त्यांना वाचविण्यासाठी पाणयात उडी मारली. त्यापैकी तीन मुलांना व दोन्ही महिलांना तेथील स्थानिक नागरिकांनी तात्काळ पाण्याबाहेर काढले.

दरम्यान रोहित व ओंकार या दोन्ही भावंडांचा गणेश विसर्जन करीत असताना तलावामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अशी माहिती बचाव कार्यामध्ये सहभागी असलेले भगतसिंग ग्रुपचे बच्चूसिंग टाक यांनी दिलेली आहे. हडपसर येथील बच्चूसिंग टाक व आझादसिंग टाक, अग्निसशामक दल, लोणी काळभोर पोलीस यांनी येथे शोधमोहीम राबवली होती. दोन तासाच्या शोध मोहिमेनंतर या दोघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची गोळ्या झाडून हत्या
कलमाडींचे सक्रिय राजकारणात सहभागाचे संकेत 
मंत्रिमंडळ विस्तार व खातेपालट - अन्वयार्थ 
बीड: सोलापूर-धुळे महामार्गावर अपघातात तिघांचा मृत्यू
नाशिक: गणेशोत्सवातील अनावश्यक खर्च टाळून अनाथ मुलांना ड्रेसचे वाटप
बाप्पाच्या निरोपासाठी लोटला जनसागर
रस्त्याच्या मालकीवरून पर्यटकांची कोंडी
माहितीच्या सुरक्षेला कुठे आहे 'आधार'? 
'त्यांनी' विद्यार्थीच नव्हे, तर गावालाही घडवले 
नागरिक बनले पोलिस अधिकारी