गणेश मंडळाचे कार्यकर्तेही रिंगणात 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

पुणे - गणेश मंडळाचा कार्यकर्ता म्हणून कामास सुरवात केल्यानंतर सामाजिक आणि राजकीय कार्यातून नगरसेवक पदापर्यंत पोचल्याची अनेक उदाहरणे आहेत. माजी नगरसेवक आजही मंडळाच्या कामात सहभाग घेताना दिसतात. अनेक विद्यमान नगरसेवकही अनेक मंडळांशी निगडित आहेत. हीच परंपरा कायम असून, आगामी महापालिका निवडणुकीत अनेक कार्यकर्ते मंडळाच्या जोरावर रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. 

पुणे - गणेश मंडळाचा कार्यकर्ता म्हणून कामास सुरवात केल्यानंतर सामाजिक आणि राजकीय कार्यातून नगरसेवक पदापर्यंत पोचल्याची अनेक उदाहरणे आहेत. माजी नगरसेवक आजही मंडळाच्या कामात सहभाग घेताना दिसतात. अनेक विद्यमान नगरसेवकही अनेक मंडळांशी निगडित आहेत. हीच परंपरा कायम असून, आगामी महापालिका निवडणुकीत अनेक कार्यकर्ते मंडळाच्या जोरावर रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. 

नगरसेवक आणि गणेश मंडळ हे नाते नवीन नाही. कोणत्याही राजकीय पक्षातील कारकीर्द सुरू करण्यापूर्वी अनेक जण गणेश मंडळाचे कार्यकर्ते म्हणूनच काम करतात. मंडळाचा अध्यक्ष म्हणून नाव मिळाले की राजकीय क्षेत्रातील वाटचालीकडे वळणाऱ्यांची संख्या प्रत्येक भागात दिसते. श्‍याम मानकर, नारायण चव्हाण, रवींद्र माळवदकर, रवींद्र धंगेकर, बाळासाहेब मारणे, दत्ता सागरे, विजय मारटकर, अजय भोसले, हेमंत रासणे, गणेश बीडकर, विष्णू हरिहर, संजय बालगुडे आदींनी गणेश मंडळाचा कार्यकर्ता म्हणून पुढे आले आणि राजकीय कारकीर्द घडवली आहे. गणेश मंडळ म्हणजे सामाजिक, राजकीय कामांकरिता एक चांगले हक्काचे व्यासपीठ. राजकीय इच्छाशक्ती बाळगणाऱ्यांना मंडळाच्या रूपाने कार्यकर्त्यांचा संचच मिळतो. 

शहरांतील बहुतेक नगरसेवक हे कोणत्या ना कोणत्या तरी मंडळाचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष आहेत. जवळच्या कार्यकर्त्याला मंडळाचा अध्यक्ष करून काही नगरसेवक "आधारस्तंभ' म्हणून काम करीत आहेत. काही नगरसेविकांचे पती हे मंडळाचे अध्यक्ष आहेत. बहुतांश इच्छुकांच्या कार्य अहवालात त्यांनी गणेश मंडळांमार्फत राबविलेल्या उपक्रमांचा उल्लेख दिसतो. सर्वच पक्षांकडे असलेल्या इच्छुक उमेदवारांच्या यादीत गणेश मंडळाचे अध्यक्ष आणि प्रमुख कार्यकर्त्यांचा समावेश आहे. उदा. नातूबाग मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे, मुठेश्‍वर तरुण मंडळाचे गणेश भोकरे आदी. 

सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेला, राजकीय पार्श्‍वभूमी आणि आर्थिक पाठबळ नसणाऱ्या कार्यकर्त्याला राजकीय कारकीर्द घडविण्यासाठी गणेश मंडळ हा मोठा आधार वाटतो. याच ठिकाणी सामाजिक आणि राजकीय कामाची शिकवण मिळते. या अनुभवातूनच तो पुढे काम करीत राहतो. तो मंडळापासून कधीही दूर जात नाही. पक्ष बदल होतो; पण मंडळात बदल होत नाही. 
- बाळा शेडगे, मनसे 

पुणे

टाकवे बुद्रुक : कर्जमाफीच्या लाभार्थी शेतकऱ्यांची ऑनलाईन अर्ज भरायला सायबर कॅफेत रांग लागत आहे. ऑनलाईन अर्ज दाखल करायला...

03.57 PM

जुन्नर : शेतकरी कर्जमाफीचे अर्ज भरताना 'भीक नको पण कुत्रं आवर' असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असल्याचे कृषीनिष्ठ शेतकरी...

03.36 PM

औंध : औंधरस्ता येथील पडळवस्ती येथे शुक्रवारी रात्री लागलेल्या आगीत सतरा घरे जळून खाक झाल्याने सर्वच कुटूंबे उघड्यावर पडली आहेत...

12.45 PM