वाघोलीत जल्लोषात ढोल ताशांच्या गजरात गणरायाला निरोप

Ganpati-Visarjan
Ganpati-Visarjan

वाघोली - वाघोलीत जल्लोषात ढोल ताशांच्या गजरात, हिंदी मराठी गाण्यावर ठेका धरत " गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर ", या च्या जयघोषात गणरायाला निरोप देण्यात आला. सहा तास चाललेली मिरवणूक शांततेत पार पडली. 

सांयकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पुणे नगर महामार्गावरून मिरवणुकीला प्रारंभ झाला. वाहतूक एका बाजूच्या रस्त्यावरून वळविण्यात आली होती. एकीकडे ढोल ताशा चा गजर तर दुसरीकडे मराठी हिंदी गाण्यावर विद्युत झोतात कार्यकर्त्यांनी ठेका धरला होता. यामध्ये छोटे कार्यकर्ते व महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता. अनेक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी फेटे परिधान केले होते. वाघेश्वर तरुण मंडळ, वाघेश्वर स्पोर्ट्स क्लब, शिवशक्ती तरुण मंडळ, सिद्धिविनायक तरुण  मंडळासह अनेक मंडळानी आकर्षक सजावट असलेले रथ तयार केले होते. वाघेश्वर स्पोर्ट्स क्लब च्या रथाला दोन बैल जोड्यां लावण्यात आल्या होत्या. " गणपती बाप्पा मोरया ,पुढच्या वर्षी लवकर ",या च्या जयघोषाने परिसर दुमदुमून निघाला होता. फट्याक्यांची आतिषबाजी करण्यात आली. हे क्षण टिपण्यासाठी मोबाइच्या कॅमेऱ्यांचा लखलखाट सुरू होता. वाहतूक कोंडी व मिरवणुकीवर नियंत्रणासाठी लोनीकंद पोलीस यांच्याबरोबर स्वयंसेवक व कार्यकर्त्यांनी मदत केली. सोसायटी मधील गणरायाला ही जल्लोषात निरोप देण्यात आला. त्यामध्ये महिला अग्रस्थानी होत्या. 

रुग्णवाहिकाना दिला मार्ग
वाहतूक एकाच बाजूने सुरू असल्याने धिम्यागतीने सुरू होती.मात्र रुग्णवाहिका येताच पोलीस, स्वयंसेवक, मंडळाचे कार्यकर्ते व काही युवकांनी विरुद्ध दिशेने रुग्णवाहिकेना मार्ग करून दिला. त्यामुळे रुग्णवाहिका कोंडीत न अडकता मार्गस्थ झाल्या.

डी जे जप्त 
लोहगाव रोड वर विसर्जन मिरवणुकी दरम्यान वापरण्यात आलेले डि जे वाहन लोणीकंद पोलीसांनी साऊंड सिस्टिमसह जप्त केले. तसेच संबंधीत गणेश मंडळ व डि जे वाहनाचे चालक व मालक यांच्यावर गुन्हा दाखल केला. डी जे वर कारवाईचा इशारा गणेशोत्सवापूर्वीच पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी दिला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com