खडकवासला : ढोल ताशांच्या गजरात श्री गणेशाला निरोप 

khadakwasla
khadakwasla

खडकवासला : खडकवासला, किरकटवाडी परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडळांनी आकर्षक फुलांच्या सजावटी ,विद्यूत रोषणाई , देखाव्यांनी लक्ष वेधले जात होते.  ढोल ताशांच्या गजरात  गणेशाचे विसर्जन करण्यात आले. 

खडकवासला येथील मयुर मित्र मंडळ, अखिल मंडई मंडळ, मधली तालीम तरूण मंडळ, नवयुग तरूण मंडळ, आझाद मित्र मंडळ, लिंबाची तालीम तरूण मंडळ, जयहिदं तरूण मंडळ, अमरज्योत मित्र मंडळ, देवी आई मित्र मंडळ, बजरंग मित्र मंडळ, बालाजी तरूण मंडळ, संत रोहिदास मित्र मंडळ आदी मंडळानी पांरंपारीक रिवाजात तसेच महिला लहान मुलांनी पारंपरिक वेशभूषा केलेली होती. श्रींचे विसर्जन केले. पारंपारीक ढोल ताशांची पथकाने लक्ष वेधले. 
हवेली पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरूटे, किरण बरकाले, धनसिंग बाबर, अनिकेत सोनुने, पोलीस पाटील ऋषीकेश मते आदींसह पोलीस जवान बंदोबस्तासह तैनात होते. खडकवासला धरणात श्रींचे विसर्जन करण्यात आले. याचबरोबर, गोऱ्हे बुद्रुक येथील आझाद हिंद मंडळाच्या वतीने देखील सुंदर

आरास रथ तयार केला होता. नांदेड येथील 13 मंडळांनी आणि किरकटवाडी येथील पाच मंडळांनी कोल्हेवाडीतीळ संत सावता माळी मंडळाने देखील मिरवणूक काढून आदी ठिकाणी विसर्जन मिरवणुकांत हजारो सहभागी झाले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com