उद्यान विभागाचे 65 कर्मचारी वर्ग केल्यापासून गायब?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

पुणे - महापालिका प्रशासनाने उद्यान खात्यातून वर्ग केलेले 65 कर्मचारी एक महिना झाला तरी अद्याप वृक्ष प्राधिकरणाकडे रुजू झालेले नाहीत. दोन कार्यालयांमध्ये एका चौकाचे अंतर असताना हे कुठे अडकून पडले, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

आमदार विजय काळे यांनी शिवाजीनगर मतदारसंघातील कामांच्या आढाव्यासाठी महापालिकेत आज घेतलेल्या बैठकीत हा प्रकार उघडकीस आला.

काही महिन्यांपूर्वीच प्रशासनाने उद्यान विभागाचे दोन विभागात विभाजन केले आहे. त्यानुसार उद्यान विभागाकडे शहरात नवीन उद्याने तयार करणे, उद्यानांची देखभाल-दुरुस्ती आदींची जबाबदारी आहे, तर वृक्ष प्राधिकरणाकडे वृक्ष तोडीस परवानगी देणे, रस्ता रुंदीतील वृक्षांचे स्थलांतर करणे, वाहतुकीत अडथळा ठरणाऱ्या वृक्षांच्या फांद्या छाटणे आदी कामांची जबाबदारी आहे. प्राधिकरणावर सात नगरसेवक व सात सदस्यांची निवड करण्यात आली आहे. या विभाजनानंतर उद्यान विभागातील 65 कर्मचारी वृक्ष प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आले आहेत.

उद्यान विभागाचे कार्यालय संभाजी उद्यानात तर प्राधिकरणाचे कार्यालय घोले रस्त्यावर आहे. दोन्ही कार्यालयांमध्ये केवळ एका चौकाचे अंतर आहे. उद्यान विभागाने वर्ग करूनही हे कर्मचारी अद्याप प्राधिकरणाच्या कार्यालयात रुजू झालेले नाहीत.

काळे यांनी यासंदर्भात बैठकीत विचारले असता, हे कर्मचारी अद्याप रुजू झाले नसल्याचे प्राधिकरणाने सांगितले. त्यामुळे कामकाज ठप्प झाल्याचे प्राधिकरणाच्या सदस्यांनी सांगितले. अखेर या कर्मचाऱ्यांना तातडीने हजर राहण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी दिले.

Web Title: garden department 65 employee absent