उंड्रीत भूमीगत गॅस पाईपलाईनला आग

gas line leak and  fire in undri
gas line leak and fire in undri

उंड्री : उंड्रीत आज सकाळी इरा सोसायटीजवळ भूमीगत गॅस पाईपलाईनला अचानक आग लागली. त्यानंतर प्रचंड आवाज झाला आणि परिसरता एकच खळबळ उडाली.

या सोसायटीत राहणाऱ्या घटनेच्य प्रत्यक्षदर्शी महिला नीला कामत यांनी दिलेल्या माहीतीनुसार 
आज सकाळी एम.एन जी एल.च्या मुख्य गॅसवाहीनी व  सोसायटीच्या अंतर्गत वाहीनीला जिथे जोड दिला जातो त्या ठिकाणी गॅस गळती झाली. तिथे आग लागून मोठा आवाज झाला. जवळपास अर्धा तास आग धगधगत होती.

इरा सोसायटीचे चेअरमन अतीष परदेशी यांनी  प्रसंगावधान राखून सोसायटी च्या गॅस वाहीनीचा व्हॉल्व बंद केला. आणि पुढील अनर्थ टळला. काही वेळातच पोलिस आणि अग्निशमन दलाचे पथक तिथे आले. त्यांनी काही वेळातच आग आटोक्यात आणली. सर्वात शेवटी एम एन जी एल (महानगर गॅस लिमिटेड) चे कर्मचारी हजर झाले. असे नागरिकांचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com