मतांच्या टक्केवारीत भाजप नंबर 1 - बापट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

दीड हजारावर सक्रीय कार्यकर्ते होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या सभा घेतल्या. संघटित ताकदीने आम्हाला यश मिळाले. बारामतीत राष्ट्रवादीसमोर आव्हान उभे केले होते. दडपशाही पैसा असूनही मतदारांनी भाजपला साथ दिली.

पुणे - पुणे जिल्ह्यात झालेल्या नगरपालिका निवडणुकीत भाजप मतांच्या टक्केवारीत नंबर एकचा पक्ष ठरला आहे, असा दावा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केला आहे.

पुणे जिल्ह्यात झालेल्या दहा नगरपालिकांच्या निवडणुकीचे आज निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत भाजपचे 50 हून अधिक नगरसेवक निवडून आल्याचे बापट यांनी म्हटले आहे. तसेच भाजपने आपली पूर्ण यंत्रणा कामाला लावल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

बापट म्हणाले, की नगरपालिकेसाठी आम्ही शिवसेनेशी युती करणार होतो, पण सेनेकडून प्रतिसाद मिळाला नाही. दीड हजारावर सक्रीय कार्यकर्ते होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या सभा घेतल्या. संघटित ताकदीने आम्हाला यश मिळाले. बारामतीत राष्ट्रवादीसमोर आव्हान उभे केले होते. दडपशाही पैसा असूनही मतदारांनी भाजपला साथ दिली. जिल्ह्यात 129 उमेदवार कमळ चिन्हावर, तर 35-40 पुरस्कृत होते. 8 ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार उभे केले होते. 2011 ला  फक्त 9 नगरसेवक पूर्ण जिल्ह्यात होते, आता ही संख्या 50 च्यावर गेली आहे. 3 ठिकाणी भाजप नगराध्यक्ष निवडून आले आहेत.