बापट, शिवतारे यांच्यावर कारवाई करा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

इंदापूर - इंदापूर अर्बन बॅंकेचे संचालक; तसेच बेलवाडी (ता. इंदापूर) येथील शेतकरी वसंत सोपाना पवार यांच्या आत्महत्येप्रकरणी पालकमंत्री गिरीश बापट, जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यावर तातडीने कायदेशीर करावी, या मागणीसाठी तालुका काँग्रेसच्या वतीने बुधवारी (ता. २५) शहरातून मूक मोर्चा काढण्यात आला. 

माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड. कृष्णाजी यादव यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चाचे तहसील कार्यालयाच्या प्रांगणात जाहीर सभेत रूपांतर झाले. या वेळी तहसीलदार श्रीकांत पाटील यांना निवेदन देण्यात आले. 

हर्षवर्धन पाटील म्हणाले, की उजनी जलाशय, नीरा, भीमा नदी, नीरा डावा कालवा, खडकवासला कालव्यातून गेल्या चार वर्षांपासून चुकीच्या नियोजनामुळे पिकांना पाणी न मिळाल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले. त्यामुळे त्यांना वित्तीय संस्थांची कर्जे फेडता आली नाहीत.

अतिरिक्त अडीच टीएमसी पाणी नीरा डाव्या कालव्याद्वारे सोडावे म्हणून वसंत पवार यांच्यासह शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. त्या वेळी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी १९ व २० एप्रिलपर्यंत पाणी सोडण्याचे आश्‍वासन दिले होते. पाणी न सुटल्याने वसंत पवार यांनी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेल्या दोन चिठ्ठ्या मृत्युपूर्व जबाब मानून संबंधितावर गुन्हे दाखल न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.’’

कालवा सल्लागार समितीत जे ठरते, त्याची योग्य अंमलबजावणी होत नसल्याने तालुक्‍यात पाण्याबाबत अराजकतेची स्थिती निर्माण झाली आहे, असे विलास वाघमोडे यांनी सांगितले. 

शेतीसाठी नियमित पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागत असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण असल्याचे  ॲड. यादव यांनी सांगितले.

या वेळी पंचायत समितीचे सभापती करणसिंह घोलप, नगराध्यक्षा अंकिता शहा, मुरलीधर निंबाळकर, मुकुंद शहा, कांतिलाल झगडे, भरत शहा, ॲड. हेमंत नरूटे, शहाजी शिंदे, स्वप्नील सावंत, कैलास कदम, शेखर पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन बापू जामदार यांनी केले.

Web Title: girish bapat vijay shivtare crime congress rally