पाचव्या वाढदिवसापूर्वीच होतोय मुलींचा मृत्यू

girl child health issue
girl child health issue

पुणे-  कायद्याच्या भीतीने का होईना; पण जन्माआधीच यमसदनी जाणाऱ्या मुली या जगात येऊ लागल्या खऱ्या; मात्र ती जगलीच पाहिजे, असा कुठे कायदा आहे? त्यामुळे त्यांच्या संगोपनाकडे दुर्लक्ष केले जात असून, वयाचा पाचवा वाढदिवस साजरा करण्याआधीच हे जग सोडणाऱ्यांमध्ये मुलींची संख्या मोठी आहे. 

राज्यात 2001 मध्ये झालेल्या जनगणनेत दर हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण 913 होते. ते प्रमाण दहा वर्षांमध्ये 894 पर्यंत कमी झाले. राज्यात लहान मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण वेगाने कमी होत असल्याचे झणझणीत अंजन 2011 च्या जनगणनेने घातले. त्यानंतर "गर्भधारणापूर्व आणि प्रसूतिपूर्व गर्भलिंग निदानतंत्र कायदा' (पीसीपीएनडीटी) काटेकोर राबविण्यात आला. त्यात आमूलाग्र सुधारणाही केल्या. त्यामुळे गर्भलिंग निदान आणि स्त्रीभ्रूण हत्या याला चाप बसला. त्यातून राज्यात मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढत असल्याचे निरीक्षण राज्याच्या आरोग्य खात्याने नोंदविले आहे. मात्र, जन्मलेल्या मुलींपैकी काहीच मुली आपला पाचवा वाढदिवस साजरा करतात, असा नवीन कलदेखील आरोग्य खात्याने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीने दिसून येत आहे. 

जन्मतः मुली जगतात 
राज्यात दरवर्षी 37 हजार 531 मुले (मुलगा आणि मुलगी) वयाच्या पाचव्या वर्षांपर्यंत मृत्युमुखी पडतात. त्यापैकी 23 हजार 277 मुले जेमते 28 दिवसच जगतात. यात मुलांचे प्रमाण मोठे आहे. नवजात अर्भकांच्या मृत्यूच्या प्रमाणात दर हजार जिवंत जन्मणाऱ्यांमध्ये 17 मुलांचा मृत्यू होतो, तर फक्त नऊ मुली आपले प्राण सोडतात. यावरून मुली जन्मतः मृत्यूवर मात करतात, हे दिसते. 

हजारामागे 20 मुली सोडतात प्राण 
जन्मलेल्या एक हजार जिवंत बाळांपैकी पाच वर्षांपर्यंत मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये मुलींचे प्रमाण सर्वाधिक आहे. राज्यात पाच वर्षांपर्यंत एक हजारांतील 20 मुली प्राण सोडतात. त्यात ग्रामीण भागातील मुलींचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्या खालोखाल शहरी भागातील मुली आहेत. 

लिंगनिहाय नवजात अर्भकांच्या मृत्यूचे प्रमाण 
मुले ....... 17 
मुली ...... 9 
(दर हजार जिवंत जन्मानंतर पहिल्या 28 दिवसांमध्ये मृत्यू होणारे अर्भक) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com