उत्तम नागरी सुविधा द्या

उत्तम नागरी सुविधा द्या

पिंपरी - शहर स्मार्ट बनविणे म्हणजे केवळ सौंदर्यीकरण नसून नागरिकांचे राहणीमानही सुधारले पाहिजे. त्यांना उत्तम नागरी सुविधा मिळायला हव्यात. मोठ्या प्रकल्पांच्या देखभाल-दुरुस्तीकडे लक्ष द्यावे. विकासकामांसाठी टाकलेल्या आरक्षणांचा विकास व्हायला हवा, असे विविध मुद्दे स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी चिंचवड येथे उपस्थित केले.

शहरात "स्मार्ट सिटी' अभियान राबविण्यासाठी स्मार्ट सिटी प्रस्ताव तयार करणे आवश्‍यक आहे. त्याबाबतची कार्यवाही सध्या सुरू आहे. शहरातील स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींसोबत चिंचवड येथील ऑटो क्‍लस्टर सभागृहात शुक्रवारी (ता.3) बैठक झाली. सहायक आयुक्त अण्णा बोदडे, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी अनिता कोटलवार, "क्रिसिल'चे प्रतीक गांधी, अब्बास हरहरवाला यांनी स्मार्ट सिटी प्रस्तावाबाबत सादरीकरण केले.
ज्येष्ठ नागरिक महासंघाचे सूर्यकांत मुथियान, डॉ. सदाशिव देशपांडे, जे. जे. जगताप, शिवदास महाजन, वृषाली मरळ, जयवंत भोसले, सुनीता जयवंत, नाम प्रतिष्ठानचे तुषार शिंदे, संस्कार प्रतिष्ठानचे डॉ. मोहन गायकवाड, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे रमेश सरदेसाई, पतंजली योगपीठाचे हिरामण भुजबळ, सायकलमित्र प्रशांत बारटक्के, घरकुल फेडरेशनचे विश्वास कदम उपस्थित होते. माहिती व जनसंपर्कचे रमेश भोसले यांनी आभार मानले.

प्रमुख सूचना -
* पाणीबचतीसाठी जनजागृती करावी
* कचरानिर्मूलनासाठी सोसायटी आणि प्रभागात उभारा यंत्रणा
* बीआरटी' मार्गांवर बस सुविधा पुरवा
* मोठ्या बसस्थानकांवर लावावे वेळापत्रक
* चोवीस तास पाणीपुरवठ्याची योजना राबवावी
* पवना नदी सुधार योजना मार्गी लावा
* खोदकाम केलेल्या रस्त्यांची तत्काळ व्हावी दुरुस्ती
* आवश्‍यक मार्गांवर पीएमपी बस फेऱ्या वाढवा
* पदपथ अतिक्रमणमुक्‍त करा
* रिक्षांसाठी मीटरसक्तीची अंमलबजावणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com