सरकारी गाड्याही झेब्रा क्रॉसिंगवर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 डिसेंबर 2016

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या देशाचे भवितव्य उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना आपण सहकार्य केले पाहिजे. घरातून कामानिमित्त बाहेर पडताना दहा मिनिटे लवकर निघाल्यास सिग्नलला घाई करण्याची गरज भासणार नाही.
- नागेश धरणे, वाहनचालक

पुणे - सामान्य नागरिकच नव्हे, तर सरकारी वाहनेही वाहतुकीचे नियम पायदळी कसे तुडवतात, याचे उत्तम उदाहरण बेलबाग चौकात ‘रोटरी क्‍लब ऑफ पुणे, इन्स्पिरा’च्या सदस्यांनी टिपले. ‘भारत सरकार’ असे लिहिलेली मोटार आणि सेना दलाचे वाहन झेब्रा क्रॉसिंगवर थांबल्याचे; तर गणवेशातील पोलिस दुचाकीच्या हॅंडलला हेल्मेट लावून जात असल्याचे शनिवारी दिसून आले.

‘सकाळ’च्या पुढाकाराने रोटरी क्‍लब आणि वाहतूक पोलिसांच्या वतीने शहरात वाहतूक अभियान राबविण्यात येत आहे. ‘रोटरी क्‍लब ऑफ पुणे, इन्स्पिरा’च्या सदस्यांनी शनिवारी सकाळी बेलबाग चौकात हे अभियान राबविले. या क्‍लबच्या अध्यक्षा पिनल वानखडे, दिलीप देशपांडे, आम्रपाली चव्हाण, रसिका चौंधे, मयुरा होले, संगीता माळी, राधिका वाईकर आदी उपस्थित होते.

वाहतूक पोलिस आणि रोटरी क्‍लबच्या सदस्यांनी छायाचित्रे काढताना झेब्रा क्रॉसिंगवरील काही वाहनचालक मागे सरकले. काही चालक आमचे छायाचित्र घेऊ नका, अशी विनवणी करीत होते. तर, काही जण आपला काही संबंध नसल्याच्या थाटात उभे होते. या अभियानात वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केल्याचे वानखडे यांनी सांगितले. मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. राजेंद्र जगताप यांनी या अभियानाची प्रशंसा केली.

पुणे

पुणे : 'अरे या चीनचं करायचं काय.. खाली डोकं, वर पाय!' अशा घोषणा देत राष्ट्रीय हिंदू आंदोलन व हिंदू जनजागृतीच्या...

06.54 PM

पुणे : 'प्रत्येक प्रभागात योग केंद्र', 'ऍमिनिटी स्पेसचा सुयोग्य वापर', 'पारदर्शक, गतीमान आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार', '...

02.12 PM

जुनी सांगवी - जुनी सांगवीतील पवनानदी घाटाजवळील स्मशानभुमीचे काम सध्या संथ गतीने होत असल्याने ऐन पावसाळ्यात नागरीकांना अंत्यविधी व...

11.27 AM