ग्रामपंचायत कराची विक्रमी वसुली

गजेंद्र बडे
बुधवार, 25 एप्रिल 2018

पुणे - जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची गेल्या आर्थिक वर्षाअखेर विक्रमी २२० कोटी ९४ लाख ५५ हजार रुपयांचा करवसुली झाली आहे. करवसुलीचे हे प्रमाण सरासरी ७६.२४ टक्के एवढे आहे. या करवसुलीत पुणे जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. एकूण करवसुलीपैकी विशेष पाणीपट्टीपोटी २२ कोटी १६ लाख ८५ हजार रुपयांची वसुली झाली आहे. 

याबाबत जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर यांनी सांगितले, ‘‘जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या एकूण करांची ४१ कोटी ९० लाख ५४ हजार रुपयांची थकबाकी होती. त्यात गेल्या आर्थिक वर्षातील एकूण करांची २२० कोटी ९८ लाख २३ हजार रुपयांची भर पडली. यानुसार ग्रामपंचायत कराचा आकडा हा २६२ कोटी ८८ लाख ७७ हजार रुपये एवढा झाला. त्यापैकी १९८ कोटी ७७ लाख ७० हजार रुपयांची वसुली झाली आहे. याशिवाय विशेष पाणीपट्टीचे २२ कोटी १६ लाख ८५ हजार रुपये, अशी एकूण २२० कोटी ९४ लाख ५५ हजार रुपयांची करवसुली झाली आहे.’’ 

दरम्यान, ग्रामपंचायतींना विविध चार प्रकारच्या करांमधून दरवर्षी उत्पन्न मिळत असते. या सर्व करांना मिळून ग्रामपंचायत कर म्हटले जाते. यामध्ये मालमत्ता कर, दिवाबत्ती कर, सामान्य आरोग्य रक्षण उपकर आणि सामान्य पाणीपट्टी या चार करांचा समावेश असतो. याशिवाय विशेष पाणीपट्टी कर हा वेगळा असतो. सार्वजनिक ठिकाणी पाणी भरणाऱ्या कुटुंबांना सामान्य पाणीपट्टी; तर नळ जोडणी घेतलेल्या कुटुंबांना विशेष पाणीपट्टी आकारण्यात येते. विशेष पाणीपट्टी हे सामान्य पाणीपट्टीपेक्षा तुलनेने अधिक असते.

Web Title: grampanchyat tax recovery