ट्रक चालकास मारहाण करुन लुटणाऱ्या टोळीस अटक

jail
jail

लोणी काळभोर (पुणे) : हडपसर-सासवड मार्गावरील दिवेघाटात शनिवारी (ता. 22) मध्यरात्रीच्या सुमारास ट्रक चालकास मारहाण करुन लुटणाऱ्या पाच जणांच्या टोळीला लोणी काळभोर पोलिसांनी अवघ्या चोविस तासाच्या आतच मोठ्या शिताफीने जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. पाचपैकी तीनजण अल्पवयीन असुन, दोघांना अटक करण्यात आली आहे तर तीन अल्पवचीन मुलांना बाल सुधारगृहात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी दिली. 

ट्रक चालकास मारहाण करुन लुटल्याप्रकरणी तुळशीराम शहाजी उघडे (वय- 19 वर्षे, रा. गोकुळनगर, कात्रज, मुळपत्ता, कोरेगाव ता. कर्जत जि. नगर) व लाला दादा वाघमारे (वय- 18 वर्षे, रा. गोकुळनगर, कात्रज मुळ पत्ता- सुस्ते ता. पंढरपुर जि. सोलापुर) या दोघांना चोरलेल्या मुद्देमालासह अटक केली आहे. तर वरील दोघांच्या समवेत ताब्यात घेतलेले तीनही अल्पवयीन मुलेही नगर जिल्हातील आहेत. याप्रकरणी मंगलसिंग नगीना माथुर (वय- 43 वर्षे, रा. उरुळी देवाची ता. हवेली, मुळगाव- बंगरीसुभेद बिहार) यांनी तक्रार दिली होती. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी देवाची हद्दीतील एका गोदामातुन सोफासेटच्या वस्तु घेऊन शनिवारी (ता. 22) मध्यरात्रीच्या सुमारास मंगलसिंग माथुर हे हडपसर-सासवड मार्गावरील दिवेघाटातुन सासवडेमार्गे साताऱ्याला जाण्यासाठी निघाले होते. त्याच्या ताब्यातील ट्रक दिवेघाटात आला असता, दोन मोटार सायकलवरुन आलेल्या पाच जनांनी ट्रक अडवली. व मंगलसिंग यांना मारहान करण्यास सुरवात केली. तसेच त्यांच्या खिशातील मोबाईल फोन व रोख रकक्म असा साडेआठ हजार रुपये किमतीचा ऐवज पळवुन नेला. सकाळी ही बाब मंगलसिंग माथुर यांनी ट्रकमालकाला सांगितल्यावर वरील प्रकार उघडकीस आला. दरम्यान मंगलसिंग माथुर व ट्रक मालकाने लोणी काळभोर पोलिसात जाऊन रविवारी (ता. 23) रात्री दहा वाजनेच्या सुमारास गुन्हा दाखल केला. 

दरम्यान मंगलसिंग माथुर यांनी पोलिसात गुन्हा दाखल करताच, वरील पाचही चोरट्यांनी वापरलेल्या दुचाकीच्या नंबरवरुन सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र महानवर व त्यांच्या सहकाऱ्यांनी कात्रज परीसरात जाऊन गुन्हात वापरलेल्या मोटार सायकलच्या मालकास ताब्यात घेऊन त्याच्या विचारणा केली असता, गुन्हा केलेल्या आरोपींची नावे पोलिसांना मिळाली. यावर पोलिसांनी तात्काळ पाचही जनांना गन्हा घडल्यापासुन केवळ चोविस तासाच्या आत चार वेगवेगळ्या ठिकाणाहुन ताब्यात घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com