गुढीपाडव्यामुळे बाजारपेठेत ‘गोडी’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 मार्च 2017

पुणे - चैत्र शुद्ध प्रतिपदा...साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त....हिंदू नववर्ष दिन....कुलदैवतांची षोडशोपचारे पूजाअर्चा करायची आणि ‘ब्रह्मध्वज’ अर्थातच गुढी उभी करायची. देवादिकांस नैवेद्य दाखवून मिष्ठान्न भोजनाचा आस्वाद घ्यायचा. एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देत, नव्या संकल्पांची सुरवात करायचा दिवस... मंगळवार (ता. २८) पासून हे नवे वर्ष सुरू होत असल्याने रविवारी नागरिकांनी खरेदीचा आनंद घेतला. 

चैत्र महिन्यातल्या प्रतिपदेपासून वसंत ऋतू आणि हेमलंबीनाम संवत्सर सुरू होत आहे. घरोघरी देवादिकांची पूजा करून पंचांगाची पूजा करण्यात येते. विशेष म्हणजे या शुभ मुहूर्तावर नागरिक नवीन वस्तू खरेदी करतात. त्यामुळे इलेक्‍ट्रॉनिक, इलेक्‍ट्रिकल वस्तूंसह कापड बाजार, सोन्या-चांदीच्या पेढ्याही सजल्या आहेत. दरम्यान, रविवारीही धार्मिक पुस्तके, तोरण, खण, साड्या, रेशमी वस्त्र, गुढीसाठी कळक, साखरेची गाठी, रेडिमेड गुढी, पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत नागरिकांनी गर्दी केली होती. 

पूजेकरिता जेजुरीवरून आलेला दवणा, आंब्याच्या डहाळ्या आणि विविध प्रकारची फुले फुलबाजारात आली आहेत. धार्मिक पुस्तकांच्या दुकानांतही धार्मिक विधी, व्रत वैकल्याच्या पुस्तकांकरिता नागरिकांकडून विचारणा होत होती. मिठाईच्या दुकानदारांकडे आवडत्या पदार्थांच्या ऑर्डर्सही नागरिक देत होते. 

‘‘गुढीपाडव्याकरिता दोन महिने अगोदरच दुकानदारांना तयारी करावी लागते. चैत्र महिन्यात रामनवमी आणि हनुमान जयंती असते. साहजिकच पूजा साहित्याची लाखोंची उलाढाल होते. अनेकांना रोजगारही मिळतो,’’ असे विक्रेते धनंजय घोलप यांनी सांगितले.  

सकाळी साडेआठनंतर उभारा गुढी
मंगळवारी (ता. २८) सकाळी आठ वाजून २७ मिनिटांपर्यंत अमावास्या आहे. त्यानंतर चैत्र शुद्ध प्रतिपदा सुरू होत असून, ब्रह्मध्वजाय नमः म्हणून गुढी उभारावी. पंचांगावरील गणपतीच्या चित्राचे पूजन करावे. हिंदू नववर्षाला संस्कृतमध्ये संवत्सर असे म्हणतात. अशी एकूण साठ संवत्सरे आहेत. कालगणनेनुसार गुरू ग्रहाचा भ्रमण कालावधी बारा वर्षांचा असतो. अशी पाच आवर्तने पूर्ण झाली की साठ वर्षे पूर्ण होतात. इंग्रजी नववर्षाला नाव नाही. युधिष्ठीर शक तीन हजार ४४ वर्षे होते. विक्रम शक १३५ वर्षे होते. शालिवाहन शक अठरा हजार वर्षे असून, आत्तापर्यंत त्यापैकी १९३८ वर्षे झाली आहेत, असे पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितले. 

Web Title: gudi padwa shopping