हडपसर - ऋषीआनंदवन प्रकल्पाचे भूमिपूजन

हडपसर - ऋषीआनंदवन प्रकल्पाचे भूमिपूजन

हडपसर - पर्यावरण मुक्तीसाठी जय आनंद ग्रुप व लायन्स क्लब ऑफ पूना गणेशखिंड यांच्या संयुक्त विद्यमाने ऋषीआनंदवन प्रकल्प उभारला जात आहे. या प्रकल्पामध्ये देशी वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तसेच लोकांना मोकळी हवा घेण्यासाठी जॉगिंग ट्रक बांधण्यात येणार आहे. 

या प्रकल्पासाठी पुणे महापालिका, वृक्ष संवर्धन समिती व उद्यान विभाग पूर्णपणे सहकार्य करेल, असे मत महापौर मुक्ता टिळक यांनी व्यक्त केले. सातववाडी जवळील बनकर शाळेसमोर ऋषीआनंदवनचे भूमिपूजन व वृक्षारोपण खासदार दिलीप गांधी यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून महापौर मुक्ता टिळक बोलत होत्या.

याप्रसंगी नवी दिल्ली येथील जैन कॉन्फरन्सचे माजी अध्यक्ष अविनाश चोरडिया, ऋषीआनंदवनचे अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा, लायन्स क्लब ऑफ पूना गणेशखिंडचे अध्यक्ष विजय भंडारी, जय आनंद ग्रुपचे अध्यक्ष शांतीलाल नवलाखा, कार्याध्यक्ष विजय पारख, नगरसेवक योगेश ससाणे, मारुती तुपे, प्रविण चोरबेले, माजी नगरसेविका सुशीला नेटके, शिवाजी पवार, महापालिका उद्यान अधीक्षक संतोष कांबळे, डॉ. शंतनू जगदाळे, झुंबरलाल कोठारी, पूना मर्चंट चेंबरचे सचिव अशोक लोढा, जय आनंद संजय कटारिया उपस्थित होते.  खासदार दिलीप गांधी यांनी सांगितले की, पर्यावरणावर जनजागृती झाली पाहिजे. त्यासाठी ऋषीआनंदवनमध्ये पाच ते सात फुटाची वृक्षांचे वृक्षारोपण केले पाहिजे. जेणेकरून नागरिकांना प्रदुषण मुक्त हवा मिळेल, अशा प्रकल्पामधून प्रदुषण मुक्त भारत संकल्प राबविता येईल.

यावेळी ऋषीआनंदवनचे अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासनाचे पाटबंधारे विभाग यांच्या जागेमध्ये यांच्या जागेमध्ये होणारे अतिक्रमण वाचविण्यासाठी या जागेमध्ये वृक्षलागवड करून वृक्ष संवर्धन पुणे महापालिका व खाजगी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून करण्याचा उद्देश आहे. या उद्देशातून जय आनंद ग्रुपच्यावतीने हडपसर जवळील सातववाडीजवळील बनकर शाळेसमोर ऋषीआनंदवन प्रकल्प सुमारे पाच एकर वीस गुंठे जागेत वृक्ष लागवड करून वृक्ष संवर्धन करण्यात येणार आहे. या प्रकल्पात विविध देशी वृक्ष लावण्यात येणार आहे. चोवीस तीर्थंकरांच्या नावाने या प्रकल्पात तीर्थकार विहार उभारण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे सत्तावीस नक्षत्रांच्या नावाने त्याच्या आकारानुसार नक्षत्रवनची संकल्पना राबविण्यात येणार आहे. जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे इको योगा सेंटर, जॉगिंग ट्रॅक बांधण्यात येणार आहे. त्यामुळे हा संपूर्ण परिसर प्रदुर्षण मुक्त राहणार आहे. लोकांना मनःशांतीसाठी मिळण्यासाठी या ऋषीआनंदवन प्रकल्पाचा फायदा होणार आहे.

यावेळी समाजभूषण अशोक पगारिया यांनी वृक्षसंवर्धनासाठी २४००० रुपयांची रोख रक्कम देणगी दिली. तर लायन रघुनाथ ढोले यांनी ५००० वृक्ष लागवडीसाठी देण्याचे जाहीर केले. या कार्यक्रमाचे प्रास्तविक जय आनंदचे अध्यक्ष शांतीलाल नवलाखा यांनी केले तर सूत्रसंचालन ऋषीआनंदवनचे अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा यांनी केले तर आभार जय आनंद ग्रुपचे कार्याध्यक्ष विजय पारख यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com