‘पुणेकरांना भाजपच देईल पारदर्शक कारभार’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

हडपसर - ‘‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जनतेच्या विश्वासाला पायदळी तुडवले. भ्रष्टाचार, घोटाळ्यात या पक्षातील नेते अडकले आहेत. गेल्या १५ वर्षांत महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला शहरातील पायाभूत समस्या सोडवता आल्या नाहीत. त्यामुळेच लोकसभा व विधानसभा निवडणुका पाठोपाठ नगरपालिकांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला जनतेने नाकारले. पारदर्शक व आदर्श कारभारासाठी पुणेकर मतदारांनी आता महापालिकेवरही भाजपचा झेंडा फडकविण्याचा निर्णय घेतला आहे,’’ असे प्रतिपादन भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी केले.

प्रभाग २२ मधील भाजपच्या मुख्य निवडणूक कचेरीचे उद्‌घाटन गोगावले यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हनुमंत ऊर्फ मामा जगदाळे होते. आमदार योगेश टिळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रभागातील भाजपचे अधिकृत उमेदवार व माजी स्थायी समिती अध्यक्ष दिलीप तुपे, माजी नगरसेविका सुजाता अशोक जमदाडे, संदीप दळवी, सुकन्या गायकवाड हे चार उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

आमदार टिळेकर म्हणाले, ‘‘शहराच्या पूर्व भागाचा विकास नियोजनशून्य झाला आहे. हे भाग १९५२ मध्ये महापालिकेत आले, मात्र आजवर सत्ताधाऱ्यांनी या भागाच्या विकासाकडे दुर्लक्ष केले. मी आमदार झाल्यानंतर मतदार संघातील रखडलेली कामे प्राधान्याने मार्गी लावली. या कामांच्या जोरावर भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून येतील.’’

दिलीप तुपे म्हणाले, ‘‘महापालिका निवडणुकीत पूर्व भागाचा कार्यकर्ता पेटून उठला आहे. त्यामुळे प्रभाग २२ मध्ये कमळ फुलणार आहे. भाजपचे सर्वाधिक नगरसेवक आम्ही येथून निवडून देऊ.’’ याप्रसंगी अप्पा हाडके, अशोक जमदाडे, प्रा. प्रकाश फुलारे, संतोष खरात, रवी तुपे, अनिल तुपे, विराज तुपे, पवन आग्रवाल, सुरेश गायकवाड, हिंदूराव वाडेकर, उत्तमराव पवार, ॲड. सत्यजित तुपे, विलास तुपे, सुलभाताई कांबळे, अशोक जगताप, सुरेश तिकोने, ॲड. महेंद्र तुपे आदी उपस्थित होते.

Web Title: hadapsar prabhag 22 bjp