हडपसरमध्ये दिव्यांग मुलांचाही सहभाग

वानवडी - बालकुमार चित्रकला स्पर्धेत सहभागी झालेले दिव्यांग विद्यार्थी.
वानवडी - बालकुमार चित्रकला स्पर्धेत सहभागी झालेले दिव्यांग विद्यार्थी.

हडपसर - बालकुमारांच्या कल्पनाशक्तीला वाव देणाऱ्या चित्रकला स्पर्धेत मुलांना सहभागी करण्यासाठी पालकदेखील उत्साही होते. मुलांच्या चेहऱ्यावर स्पर्धेत सहभागाचा आनंद होताच. हा उपक्रम वर्षातून दोन वेळा तरी असावा, अशा प्रतिक्रिया पालकांनी नोंदवल्या. चार भिंतींपेक्षा मोकळ्या निसर्गरम्य वातावरणात ही स्पर्धा व्हावी, त्यातून मुलांच्या कौशल्याला अधिक वाव मिळेल, अशीही प्रतिक्रिया पालकांनी नोंदवली. 

चिमुकल्यांचे निरनिराळे प्रयोग रविवारी कागदावर फुलत होते. त्यात कल्पनांचे रंग भरले जात होते. त्यामुळे ‘सकाळ’ची बालमित्र चित्रकला स्पर्धा क्षणाक्षणाला नवे आनंददायी रंग धारण करत होती. सुटीचा दिवस असतानाही थंडीतच मुले आणि पालक सकाळी लवकर उठून स्वेटर, शालींसह स्पर्धा केंद्राबाहेर हजर होते. कोणी टपरीवरील वाफाळलेला चहा घेत, तर कोणी घरातून आणलेला स्वत:जवळील खाऊचा आस्वाद घेत होते; पण प्रत्येकाला उत्सुकता होती ती चित्रकला स्पर्धेची. त्याची घोषणा होताच मुले स्पर्धा केंद्रावर पळत सुटली. प्रश्‍नपत्रिका हातात मिळाल्यानंतर कोणत्या विषयावर चित्र काढायचे, यावर चर्चा करण्यात ते दंग झाले.

वानवडी येथील अपंगकल्याणकारी संस्थेतील दिव्यांग मुलांनीही या स्पर्धेत सहभाग घेतला. अपंगत्वावर मात करत त्यांनी चित्रे रेखाटली. चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून आपल्यातील कलागुण इतरांना दाखविण्यासाठी ही मुले उत्सुक होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com