वळसे पाटलांच्या प्रयत्नांनी उभा राहणार सभा मंडप

सुदाम बिडकर
बुधवार, 18 एप्रिल 2018

पारगाव (पुणे) : माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या प्रयत्नातुन अवसरी बुद्रुक येथे सुमारे 25 लाख रुपये खर्चाच्या बहुउद्देशिय सभामंडपाच्या कामाला मंजुरी मिळाली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी दिली.

पारगाव (पुणे) : माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या प्रयत्नातुन अवसरी बुद्रुक येथे सुमारे 25 लाख रुपये खर्चाच्या बहुउद्देशिय सभामंडपाच्या कामाला मंजुरी मिळाली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी दिली.

अवसरी बुद्रुक ता. आंबेगाव येथील सभामंडप व विविध विकास कामांचे उद्घाटन व भुमीपुजन श्री. वळसे पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा दुध संघाचे अध्यक्ष विष्णु हिंगे पाटील हे होते याप्रसंगी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष अनिल वाळुंज, माजी जिल्हा परिषद सदस्या रेवती वाडेकर, भीमाशंकरचे संचालक शांताराम हिंगे, गौतम रोकडे, सरपंच संगिता फल्ले, उपसरपंच किशोर हिंगे, सुनिल हिंगे पाटील, अनिल हिंगे, अशोक हरिभाऊ हिंगे, प्रशांत बबनराव हिंगे, कांतारामबापु हिंगे, अरुणा शिंदे, शंकुतला हिंगे, सचिन हिंगे उपस्थित होते. 

जिल्हा दुध संघाचे अध्यक्ष विष्णु हिंगे यांच्या वैयक्तीक खर्चातुन स्वर्गीय धर्माजी सखाराम हिंगे पाटील यांच्या स्मरणार्थ 10 लाख रुपयांचे प्रवेशव्दार बांधण्यात येणार आहे. तसेच सभामंडपासाठी दिलीप वळसे पाटील यांच्या नीधीतुन 10 लाख रुपये, विवेक वळसे पाटील यांच्या प्रयत्नातुन जिल्हा परिषदेकडुन 10 लाख व उर्वरित विष्णु हिंगे पाटील खर्च करणार आहेत.  

वळसे पाटील पुढे म्हणाले अवसरी बुद्रुक, मेंगडेवाडी व निरगुडसर हे आम्ही एकच समजत असुन हा परिसर घरचा असल्यामुळे येथील विकास कामांसाठी निधी कमी पडु दिला जाणार नाही येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉग्रेसच्या विचाराच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले.सुत्रसंचालन अशोक योगिराज हिंगे, आभार प्रशांत हिंगे यांनी मानले   

Web Title: hall for programs stands in avsari