इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटी अग्रगण्य पतसंस्था - हर्षवर्धन पाटील

इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटी अग्रगण्य पतसंस्था - हर्षवर्धन पाटील

इंदापूर- इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटीने शिक्षकांची पत वाढवत राज्यातील अग्रगण्य पतसंस्था असा नावलौकीक संपादन केला आहे. सोसायटीने पारदर्शी काराभारास सर्वोच्च प्राधान्य देत सहकारात आदर्श निर्माण केला आहे असे प्रतिपादन माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.

इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षकांच्या सहकारी पतसंस्थेची 95 वी वार्षीक सर्वसाधारण सभा शहा सांस्कृतिक भवनमध्ये पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यानिमित्त गुणवंत शिक्षक तसेच त्यांचे पाल्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी करणसिंह घोलप, भरत शहा, देवराज जाधव, अॅड. कृष्णाजी यादव, विलास वाघमोडे, कैलास कदम, महेंद्र रेडके, पुष्पा रेडके उपस्थित होते.

पाटील पुढे म्हणाले, सोसायटीची स्थापना गुरूवर्य कै. शंकर जावडेकर यांनी 8 जानेवारी 1925 साली केली. त्या वेळेपासून ही संस्था शिक्षक हितास सर्वोच्च प्राधान्य देत असून तालुक्याच्या शैक्षणिक व आर्थिक इतिहासात संस्थेचा सिंहाचा वाटा आहे. संस्थेस माजी खासदार कै. शंकरराव पाटील यांनी शासकिय जागा मिळवून दिली होती. सदर जागेत संस्थेची अद्यावत प्रशासकिय इमारत, मंगल कार्यालय, व्यापार संकूल उभे राहिले असून संस्था आत्मनिर्भर झाली आहे. संस्थेची आर्थिक अडचण होवू नये. यासाठी विशेष बाब म्हणून रिझर्व्ह बॅंकेची परवानगी घेवून इंदापूर अर्बन बॅंकेच्या माध्यमातून सहकार्य केले जाईल.

सोसायटीचे सभापती नितीन वाघमोडे म्हणाले, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेकडून 30.25 कोटी सीसी कर्ज 11 टक्के व्याज दराने घेवून सभासदांना 10 टक्के व्याजदराने कर्जवाटप करत संस्थेने 8.5 टक्के लाभांश दिला आहे. व्यापारी गाळे, सांस्कृतिक भवन बांधकामामुळे संस्थेच्या वार्षिक उत्पन्नात 20 लाख रूपयांची भर पडली आहे. सभासदांचे अपघाती निधन झाल्यास शिक्षक कल्याण निधी तसेच नागरिक सुरक्षा विमा योजनेतून प्रत्येकी 10 लाख रूपये आर्थिक मदत केली जाते. सचिव छगन मुलाणी यांनी विषयवाचन तर स्वागत उपसभापती सुभाष भिटे, संचालक ज्ञानदेव बागल, हरिष काळेल, सुनिल मखरे यांनी केले. सुत्रसंचालन सुनिल वाघ, संजय लोहार यांनी केले. आभार प्रदर्शन वसंत फलफले यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com