एकदम कडक..!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

पुणे - पांढऱ्याशुभ्र "खादी' पायजमा- कुर्त्यावर लाल रंगाचा जॅकेट... महापालिका निवडणुकीत प्रचारासाठी इच्छुक वापरत असलेला हा हटके लूक चर्चेचा विषय ठरत आहे. प्रचारासाठी गल्लोगल्ली फिरताना मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि सगळ्यांमध्ये आपले व्यक्तिमत्त्व उठून दिसावे यासाठी इच्छुकांकडून खादी कुर्ता, पायजमा आणि जॅकेटचा "पारंपरिक', पण स्टायलिश लूक केला जात आहे.
हटके लूकसाठी गेल्या एक महिन्यापासून इच्छुकांमार्फत "खादी' कपड्यांना मागणी वाढली आहे. पांढऱ्या रंगाच्या पायजमा कुर्त्याबरोबरच मॅचिंग जॅकेटला पसंती दिली जात आहे. महिलांकडूनही रंगीबेरंगी खादी साड्यांना मागणी आहे.

निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर इच्छुकांचा सुरू झाला आहे. रॅली, गाठी- भेटी आणि प्रचार फेरीला सुरवात झाली असून, प्रचाराला जाताना पारंपरिकतेच्या जोडीला हटके लूक मिळावा, यासाठी "खादी' कपड्यांचा वापर वाढला आहे. विविधरंगी जॅकेटला मोठी मागणी असून, अशा जॅकेटचा तुटवडा भासू लागला आहे. येत्या आठवड्यात मागणी आणखीन वाढेल, असे व्यावसायिकांनी सांगितले. प्रचारात "खादी' कपडे भाव खात आहेत.

इच्छुकांकडून "खादी' कपड्यांना मोठी मागणी होत आहे. रंगीबेरंगी जॅकेटसह शर्ट आणि कुर्ता- पायजमा याला अधिक मागणी आहे. येत्या काही दिवसांत मागणी वाढेल असा अंदाज आहे. दररोज किमान दोन ते तीन इच्छुक खरेदीसाठी येत आहेत. मागणीनुसार त्याची किंमत ठरविण्यात येते.
- अनिल शिंदे, व्यवस्थापक, खादी भांडार
 
सोशल मीडियावरही खादीची धूम
निवडणुकांमध्ये खास पांढऱ्या रंगांच्या कपड्यांना विशेष महत्त्व असते. इच्छुकांनी खास फोटोशूट करून घेतलेले पांढऱ्या रंगाचा कुर्ता, शर्ट आणि त्यावर मॅचिंग जॅकेट या पेहरावातील छायाचित्रे सध्या सोशल मीडियावर झळकत आहेत. पांढराशुभ्र कुर्ता- पायजमा, जॅकेट, पक्षाचे चिन्ह आणि उपरणे अशा वेगळ्या लूकमधील सेल्फीही झळकत आहे.

Web Title: hatke look