कृषी उद्योजक होण्याचे स्वप्न पाहा - चोरडिया

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 एप्रिल 2017

पुणे - कृषी क्षेत्रात उद्योग सुरू करण्यासाठी मुबलक संधी, भरपूर वाव असून कृषी निगडित उद्योगाचे व्यवस्थापन अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर कृषी उद्योजकच (ॲग्री बिझनेसमन) व्हायचे स्वप्न उराशी बाळगा, त्यासाठी आवश्‍यक कौशल्ये स्वतःमध्ये आत्मसात करून यशस्वी उद्योजक व्हा, असा मोलाचा सल्ला मसाले प्रक्रिया उद्योगातील नामवंत ‘सुहाना मसाले’चे व्यवस्थापकीय संचालक आनंद चोरडिया यांनी ‘सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटरच्या (एसआयएलसी) ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना दिला. 
ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केल्या जाणाऱ्या कृषी उद्योजक संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. 

चोरडिया म्हणाले, की शेतीशी निगडित प्रत्येक उत्पादनावर प्रक्रिया करणे शक्‍य असून, असा उद्योग सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या कच्च्या मालाला बाजारपेठ उपलब्ध होते, तसेच हजारो लोकांना रोजगारही मिळतो. मसाले उद्योगातील संधी, व्यवस्थापनातील महत्त्वाच्या बाबींबरोबरच यशस्वी उद्योजक होण्यासाठी लागणारी कौशल्ये, उद्योगाची वाटचाल, ग्राहकांचा विश्‍वास संपादन, यशस्वी उद्योजक होण्याची सूत्रे, मार्केटिंग, निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे विघटन, शाश्‍वत शेतीसाठी सेंद्रिय पद्धतींचा वापर, मल्चिंगचे महत्त्व, बियाणे बॅंक इ.वर त्यांनी मार्गदर्शन केले. ‘एसआयएलसी’चे कार्यक्रम प्रमुख अमोल बिरारी यांनी त्यांचे स्वागत करून आभार व्यक्त केले.