'हे' गृहस्थ करतात भाकड गायींची देखभाल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

बारामती (पुणे) : शहरातील अशोकनगरसारख्या उच्चभ्रू परिसरात बाजारभावानुसार बारा गुंठे प्लॉटची किंमत सहा कोटी रुपयांच्या आसपास होईल तेथे बारामतीतील एक व्यक्ती भाकड गायींची देखभाल करत आहे. कत्तलीसाठी जाणाऱ्या गायींना विकत घेऊन त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत सांभाळ करण्याचे काम बारामतीतील राहुल जवाहर शहा (वाघोलीकर) गेल्या सहा वर्षांपासून करीत आहेत. 

अत्यंत मोक्याच्या जागी असलेल्या व्यावसायिक जागेवर राहुल वाघोलीकर यांनी गायींचा गोठा तयार केलेला आहे. त्यांच्यातील सुहृद माणसाला कत्तलीसाठी चाललेल्या गायी पाहवल्या नाहीत. सन 2012 मध्ये त्यांनी पैसे देऊन अशीच एक भाकड गाय घेतली आणि त्या नंतर त्यांनी हे काम सुरुच ठेवले. आज त्यांच्याकडे बाराहून अधिक अशा गायी आहेत. त्या पैकी 25 वासरे त्यांनी लोकांना देऊन टाकली. 

स्वखर्चाने चारा व इतर असा जवळपास महिना चाळीस हजारांचा खर्च राहुल करतात तो अगदी निरपेक्ष भावनेने. मूळातच या गायींपासून कसलाच फायदा नसतानाही स्वखर्चाने त्यांना सांभाळण्यामागे त्यांची कत्तल होऊ नये इतकाच प्रामाणिक हेतू आहे. हल्लीच्या जमान्यात स्वखर्चाने गायी सांभाळणे हे तसे अभावानेच दिसणारे चित्र, मात्र भूतदयेच्या हेतूने हे काम ते गेली सहा वर्षे सातत्याने करीत आहेत.

प्राणीमित्र असलेल्या राहुल हे अगदी आजही प्रसिध्दीपासून अलिप्त राहत हे काम करतात, दररोज सकाळचा काही वेळ ते जातीने जाऊन प्रत्येक गायीबाबत पाहणी करुन काही कमी जास्त असेल तर ते करतात. हे काम असेच पुढे चालू ठेवण्याचा त्यांचा मनोदय आहे. 

Web Title: he cares cows who are unproductive

टॅग्स