सर्वसाधारण सभांवेळी खातेप्रमुख अनुपस्थित 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मार्च 2017

पुणे - पाच सर्वसाधारण सभांचे कामकाज असूनही महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि अनेक खातेप्रमुख अनुपस्थित राहिल्यामुळे महापौर प्रशांत जगताप यांनी गुरुवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. 

पुणे - पाच सर्वसाधारण सभांचे कामकाज असूनही महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि अनेक खातेप्रमुख अनुपस्थित राहिल्यामुळे महापौर प्रशांत जगताप यांनी गुरुवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. 

महापालिका सभागृहाच्या कार्यपत्रिकेवर पाच सभांचे कामकाज होणार होते. सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यावर महापालिका आयुक्त कुणाल कुमार, तसेच अतिरिक्त आयुक्त, अनेक खातेप्रमुख अनुपस्थित होते. त्यामुळे महापौरांनी नाराजी व्यक्त केली. नगर अभियंता प्रशांत वाघमारे यांना अखेर व्यासपीठावर बोलविण्यात आले. या बाबत महापौर म्हणाले, ""महापालिकेत सत्ता बदल झाला म्हणून अधिकाऱ्यांकडून असे वर्तन अपेक्षित नव्हते. ही प्रशासकीय अस्पृश्‍यता पुणेकर कायम लक्षात ठेवतील. महापालिकेचा कार्यकाळ 14 मार्चपर्यंत आहे. किमान त्याची जाणीव तरी ठेवून अधिकाऱ्यांनी नागरिकांची कामे केली पाहिजेत.'' 

Web Title: head of the department of general meetings absent