मुख्याध्यापकांनो, तंत्रस्नेही बना!

मुख्याध्यापकांनो, तंत्रस्नेही बना!

शाळांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आणायची असेल, तर मुख्याध्यापकांनी बदलले पाहिजे, तरच त्यांचे शिक्षक बदलतील. नवे युग तंत्रज्ञानाचे आहे. ज्ञानासाठी विद्यार्थी शिक्षकांवर अवलंबून नाही. त्यांच्यापेक्षा अधिक ज्ञान आता शिक्षकांनी मिळविले पाहिजे, असा धडा शिक्षणतज्ज्ञांनी मुख्याध्यापकांना दिले. शालेय शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या विभागीय शिक्षण परिषदेत या तज्ज्ञांनी त्यांचा तास घेतला.

डॉ. सुनील मगर (संचालक, बालभारती)
कागदी पाठ्यपुस्तके हद्दपार होण्याच्या उंबरठ्यावर आपण आहोत. त्यामुळे मुख्याध्यापकांनी तंत्रस्नेही (टेक्‍नोसॅव्ही) व्हावे.
व्हॉट्‌सॲप जेवढ्या जिज्ञासेतून तुम्ही शिकला, तेवढी जिज्ञासेने अन्य तंत्रज्ञान आत्मसात करून घ्या, त्याशिवाय पर्याय नाही.
विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता परीक्षेवरून जोखण्याबरोबरच त्याने वर्षभरात कोणती कौशल्ये आत्मसात केली, हेही तपासा.
विद्यार्थी ज्ञानासाठी तुमच्यावर अवलंबून नाही, त्याच्याकडे ज्ञान मिळविण्याची असंख्य स्त्रोत इंटरनेटमुळे उपलब्ध आहेत.
आपल्याकडील दहावीचा निकाल ९० टक्के असले, तरी राष्ट्रीय सर्वेक्षणातील सरासरी निकाल हा ३४ टक्के आहे, याची जाणीव ठेवा.

अनिल गुंजाळ (शिक्षण उपनिरीक्षक, मुंबई)
स्पर्धेत आत्मविश्‍वासाने लढत, यश मिळवतो ती गुणवत्ता आहे. विद्यार्थ्यांच्या अंगी ही गुणवत्ता रुजविण्याची गरज.
शिक्षण व्यवस्थेतून ज्ञान मिळते; परंतु सुसंस्कृत नागरिक तयार करणारी शिक्षण व्यवस्था शिक्षकांनी पूर्ववत करावी.
जर विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता दिसत नसेल, तर अध्यापनाचे कार्य चुकते आहे किंवा मूल्यमापनात तरी त्रुटी आहे, हे शोधले पाहिजे.
दहावी, बारावीतील अपयशानंतर विद्यार्थी अनुचित प्रकार करतात, कारण त्यांना गुणांच्या मागे पळविले जाते. स्पर्धेची भीती त्यांना घालू नका.

शहाजी ढेकणे (शिक्षणतज्ज्ञ)
शिक्षणाचा विस्तार झाला, योजना आल्या; खर्च झाला. पण गुणवत्ता निर्माण झालीच नाही. कारण इनपुट आणि आऊटपुट यांच्यामधील प्रोसेसमध्ये अवस्थेत दोष आहे.
काळानुसार शिक्षक बदलला, तरच विद्यार्थी बदलले. त्यानंतरच जग बदलेल. त्यासाठी शिक्षकांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण आवश्‍यक.
पहिली ते आठवीपर्यंत मुलांना परीक्षा नाही; नापास करायचे नाही या योजनेचा चुकीचा अर्थ घेतला गेला. त्यातून अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत.
या योजनेचा गाभा हा विद्यार्थ्याचे सातत्यपूर्ण मूल्यमापन होता; परंतू तो अर्थ हरविला. यामुळष अध्यापन थांबले आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com