मुळशीत पावसाची दमदार हजेरी

heavy raining in mulshi taluka
heavy raining in mulshi taluka

पिरंगुट: मुळशीत पावसाने दमदार व समाधानकारक हजेरी लावल्याने मुठा खोऱे तसेच लवासा परिसरातील भातखाचरांत पाणी साचले आहे. बहुतांशी ठिकाणी शेतकऱ्यांनी भात लावणीला सुरवात केली आहे.

मोसे आणि मुठा खोऱ्यातील पन्नास टक्के भातलावणी झाली आहे. यावर्षी पावसाने योग्य साथ दिल्याने भातरोपांचेही मोठे नुकसान झाले नाही. त्यामुळे पेरणी केलेल्या भात रोपांना मोठा दिलासा मिळाला. मुठा खोरे, टेमघर धरणाचे पाणलोटक्षेत्र तसेच लवासा भागात पावसाने समाधानकारक हजेरी लावली. पश्चिम पट्ट्यात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने लवासा रस्त्यावरून पाणी वाहत होते. त्यामुळे काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.

मुठा खिंड, कोळावडे, आंदगाव आदी ठिकाणच्या रस्त्यांवरून पाणी वाहत असल्याने तसेच काही ठिकाणी पाणी रस्त्यावर साचून राहिल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत होती. सुट्टीचा दिवस असल्याने मुठा खिंड, टेमघर धरण तसेच लवासा परिसर पर्यटकांनी फुलून गेला होता. कुटुंबांसह धबधब्याच्या पाण्याखाली मनसोक्त भिजण्याचा आनंद पर्यटक घेत होते.

महिन्याभरापूर्वी मुळशीतील डोंगररांगा वणव्यांमुळे काळ्या ठिक्कर पडल्या होत्या. मात्र निसर्गाची किमया झाली आणि सारे रूपच पालटून गेले आहे. सगळीकडे धुक्यांचे लोळ, पर्जन्य धारा, धबधब्यांच्या पाण्य़ाच्या आवाज, थंडगार वारा आणि हिरवाईची रेलचेल पहायला मिळते आहे. त्यामुळे पर्यटकांचा ओढाही लवासा परिसराकडे वाढला आहे. आज लवासाच्या प्रवेश द्वाराबाहेर सुमारे अर्धा किलोमीटर लांबीच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पिरंगुट रस्त्यावरून पाणी वाहू लागले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com