दिवसा चटका, रात्री थंडी! 

दिवसा चटका, रात्री थंडी! 

पुणे - शहर आणि परिसरात गेला आठवडाभर कमाल आणि किमान तापमानात दहा अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तफावत राहिली आहे. त्यामुळे दिवसा उन्हाचा चटका आणि रात्री थंडी, असे वातावरण पुणेकर अनुभवत आहेत. 

शहरात गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. सध्या अंशत- ढगाळ वातावरण राहत आहे. दिवसभरात शहराच्या कोणत्या तरी भागात अधून-मधून पावसाची एखादी हलकी सर पडते. त्या वेळेपुरता त्या भागातील कमाल तापमानाचा पारा अंशत- खाली घसरतो; पण इतर भागांत मात्र उन्हाचा चटका कायम असतो, असा अनुभव पुणेकर गेला आठवडाभर घेत आहेत. 

पुण्यात सप्टेंबरमधील सरासरी कमाल तापमान 29.6 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 20.2 अंश सेल्सिअस असते. आठवडाभरात कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा वाढलेला होता, तर किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा कमी झाला होता. यातील तफावत 10 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होती, असे निरीक्षण हवामान खात्याने नोंदविले आहे. 

कमाल आणि किमान तापमानातील फरकामुळे हवेतील विषाणूंच्या संसर्गास पोषक वातावरण मिळते. त्यामुळे इन्फ्लूएंझा प्रकारातील विषाणू सक्रिय होतात. तसेच डेंगी, चिकूनगुनियासारख्या कीटकजन्य आजारांचे प्रमाण वाढते. 
-डॉ. सतीश कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com