‘वर्क फ्रॉम होम’ अटीमुळे घरमालक काळजीत

कोरोनामुळे आयटी कंपन्यांतील कामाची पद्धत बदलली आहे. लॉकडाउनमध्ये घरून काम देण्यात आले, आता तीच पद्धत कायमस्वरूपी सुरू ठेवण्याचा अट काही कंपन्या घालू लागल्या आहेत.
Work From Home
Work From HomeSakal
Summary

कोरोनामुळे आयटी कंपन्यांतील कामाची पद्धत बदलली आहे. लॉकडाउनमध्ये घरून काम देण्यात आले, आता तीच पद्धत कायमस्वरूपी सुरू ठेवण्याचा अट काही कंपन्या घालू लागल्या आहेत.

- अमोल अवचिते

पुणे - कोरोनामुळे (Corona) आयटी कंपन्यांतील (IT Company) कामाची पद्धत (Work Process) बदलली आहे. लॉकडाउनमध्ये (Lockdown) घरून काम (Work From Home) देण्यात आले, आता तीच पद्धत कायमस्वरूपी सुरू ठेवण्याचा अट काही कंपन्या घालू लागल्या आहेत. त्यामुळे कोरोनामुळे सदनिका सोडून गेलेले भाडेकरू (Tenant) पुन्हा येतील का? तसेच मोकळ्या झालेल्या सदनिका (Flats) पुन्हा तशाच भाड्याने जातील का? या काळजीत आयटी क्षेत्राजवळ राहणारे घरमालक (Home Owner) पडले आहेत.

शहरात खराडी, हिंजवडी, कल्याणीनगर, विमाननगर, फुरसुंगी, बाणेर, बालेवाडी, मगरपट्टा या ठिकाणी आयटी पार्क आहे. आयटी क्षेत्र येताच या भागात मोठ्या प्रमाणात इमारती उभारल्या जात आहेत. आयटीमध्ये राज्यासह इतर राज्यातील कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे. उच्चभ्रू सोसायट्यांपासून ते वैयक्तिक घर मालकाच्या इमारतीमध्ये अनेक आयटी कर्मचारी भाडेतत्त्वावर सदनिकेत राहतात, तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पेइंग गेस्ट (पीजी) म्हणून राहणाऱ्यांचीही संख्या मोठी आहे. पीजीसाठी इमारतीनुसार ८० ते ९० हजार रुपये एवढे भाडे प्रती महिना मिळते. त्यामुळे अनेकांनी पीजीच्या मागणीनुसार इमारती बांधून भाड्याने दिल्या आहेत. आता अनेक इमारती मोकळ्या पडल्या असल्याचे दिसून येते, असे प्रसन्न गायकवाड या एजंटने सांगितले.

घरमालकांच्या समस्या...

  • सदनिका मोकळ्या झाल्याने आर्थिक अडचण

  • बँकेचे हप्ते थकले

  • नवीन भाडेकरू मिळणे अवघड

  • मासिक भाडे करावे लागले कमी

  • सात ते आठ हजारांतही भाड्याने सदनिका देण्याची तयारी

Work From Home
पुणे महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे कारभारी कोण ?

महिन्याकाठी एकूण एक लाख २० हजार भाडे मिळत होते. आता मात्र निम्मेसुद्धा मिळत नाही. बॅंकेचे हप्ता भरणे कठीण होऊन बसले आहे. सर्व काही सुरळीत होताच पुन्हा आयटी कंपन्या पूर्ण क्षमतेने सुरू होतील, असे वाटत होते. आयटी कंपनीतील कर्मचारी वेळेत भाडे देतात. कंपन्या सुरू होणार आहेत, अशीही माहिती आहे, मात्र घरून काम करण्याच्या अटीमुळे यावर परिणाम होऊ शकतो.

- प्रवीण बडदे, (नाव बदलेले आहे) घरमालक

रिअल इस्टेट व्यवसाय चांगलाच तेजीत होता. कोरोनामुळे हा व्यवसाय ठप्प झाला आहे. मागील काही दिवसांपूर्वी अनेक जण या व्यवसायातून बाहेर पडले आहेत. एप्रिलपासून अनेक कंपन्या सुरू होणार आहेत, असे मेल कंपन्यांनी एजंटांना पाठवले आहेत. त्यामुळे पुन्हा पूर्वीप्रमाणे सुरू होईल, असे वाटते.

- विनोद जगदाळे, (नाव बदलेले आहे) एजंट

मिळणारे भाडे...

  • पीजी इमारती : ३० ते ५० हजारांपासून पुढे

  • सोसायटीतील वन बीएचके १२ ते १४ हजार

  • सोसायटीतील टु बीएचके १६ ते २१ हजार

  • वैयक्तिक इमारत वन बीएचके १० ते १२ हजार

  • वैयक्तिक इमारत टु बीएचके १४ ते १६ हजार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com