क्रीडा गुरूंचा सत्कार

रमेश मोरे
बुधवार, 25 जुलै 2018

जुनी सांगवी : दापोडी सांगवी येथील कै.पांडुरंग धोंडीबा माकर प्रतिष्ठाण व कै.शांताराम बाईत प्रतिष्ठाणच्या वतिने गुरुपौर्णिमे निमित्त विवध क्रिडा क्षेत्रातील उल्लेखनिय कार्य करणाऱ्या क्रीडागुरूंचा सन्मान सांगवी येथे करण्यात आला. येथील ओम साई फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय मराठे यांच्या हस्ते मदन कोठुळे (क्रिडा संघटक) अजितसिंग कोचर (बॉक्सिंग कोच) सुरज साळुंके (क्रिडा मार्गदर्शक) संदीप आतिक (क्रिडा बॉक्सिंग) विजय शिर्के(क्रिडा संघटक) शेखर राव (बॉक्सिंग कोच) बलभिम भोसले (क्रिडा शिक्षक) यांना गुरुवर्य पुरस्कार 2018 या पुरस्काराने शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले.

यावेळी अजितसिंग कोचर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मुलांना जास्तीत जास्त खेळाकडे लक्ष देण्याची गरज आहे. सर्व शाळेमध्ये खेळ घेऊन प्रत्येक खेळाला प्रशिक्षक गुरूअसणे गरजेचे आहे. मुलांचे लक्ष खेळाकडे वळविल्यास मुलांचे वाईट गोष्टीकडे लक्ष जात नाही. 

गरीब होतकरू विद्यार्थी खेळाडुंच्या मागे समाजाने उभे राहावे असे सांगीतले. यावेळी सुनिल काळे, दत्तात्रय भोसले, गुलाब अल्हाट, सागर कांबळे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिपक माकर, रविंद्र बाईत, सदानंद साबळे, देवेंद्रसिंग यादव, आदी खेळाडू व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सदानंद साबळे तर आभार निलेश भाडाळे यांनी केले.

Web Title: honors Sports teachers