काळ्या पैशांसाठी फोडले फॉर्म हाउस

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016

नेरळ - कर्जत तालुक्‍यात धनिकांनी बांधलेले बंगले, फार्म हाउसमध्ये मोठ्या प्रमाणावर काळा पैसा लपवून ठेवल्याची चर्चा नेहमीच होत असते. अशाच एका बंगल्यात मुंबईतील मालकाने तब्बल 10 कोटींची काळी माया लपवल्याची "खबर' पक्की समजून काही जणांनी तेथील तिजोरी पळवली. त्यामध्ये केवळ 80 हजारांची रोख पाहून त्यांची निराशा तर झालीच; पण या प्रकरणी 11 जणांना आता पोलिस कोठडीची हवा खावी लागत आहे.

पोलिसांनी अटक केलेल्यांत कर्जत; तसेच मुंबई, नवी मुंबईतील संशयितांचा समावेश आहे. मुंबईतील आशिष प्रकाश जोशी यांचे वैजनाथ येथे फार्म हाउस आहे. तेथे 12 जुलै 2016 रोजी चोरी झाल्याची तक्रार त्यांनी कर्जत पोलिस ठाण्यात नोंदवली होती. फार्म हाउसवर काम करणाऱ्या पंढरीनाथ मधुकर गंगावणे (रा. तांबस) याला त्याचा मित्र राजेंद्र शेळके भेटायला आला.

मालकाजवळ भरपूर काळा पैसा आहे, तो बंगल्याच्या तिजोरीत लपवला आहे, अशी चर्चा त्यांच्यात झाली. राजेंद्रने ही माहिती नवी मुंबईतील राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या एका नेत्याच्या मुलास दिली. त्याने ही बातमी मुंबईतील काही मित्रांना सांगितली. बंगल्यात 10 कोटींची रक्कम असावी, असा अंदाज या सर्वांनी बांधला. सर्वांनी मिळून हा बंगला फोडून तिजोरी पळवली. 80 हजार रोख व 10 हजार किमतीची तिजोरी असा 90 हजारांचा ऐवज त्यांच्या हाती लागला.

टॅग्स