#PMPMLपीएमपीएलचा प्रवास कितपत सुरक्षित वाटतो?

pmpl.gif
pmpl.gif

पुणे : कालच वारजे पुलावरुन पीएमपीएलची बस कोसळली, 20 जण जखमी झाले. गेल्या काही महिन्यात पीएमपीएलच्या बसला अचानक आग लागल्याच्या काही घटना घडल्या. अगदी 15 दिवसांपूर्वीची एक घटना. भेकराईनगर डेपोततून (180) न. ता. वाडीची बस निघाली. हडपसरला बस पोहचेतीये तोच मोठा आवाज झाला. बसच्या मागच्या दोन चाकांमधील फायलर अचानक तुटला. त्यामुळे बस एका बाजूला झुकली आणि तेथून धूर येऊ लागला. बसला टायरचा आधार मिळाल्यामुळे बस पलटी झाली नाही. सुदैवाने दुर्घटना टळली.

पीएमपीएलच्या तांत्रिक बिघाडामुळे अशा घटना घडतात. खरचं पीएमपीएलचा प्रवास सुरक्षित आहे का? पुण्यात दररोज जवळपास लाखो प्रवासी पीएमपीएलने प्रवास करतात. पीएमपीएल ही पुणेकरांच्या दैनदिंन जीवनातील महत्वाचा भाग आहे. पीएमपीएलच्या रोज साधारण ४० बस ब्रेकडाऊन होतात. अशा दुर्घटनांमुळे प्रवाशांच्या मनात पीएमपीएलच्या सुरक्षितेविषयी शंका निर्माण होणे सहाजिक आहे. याला जबाबदार कोण? प्रशासन कि पीएमपीएल. जबाबदार कोणीही असले तरी बळी मात्र र्निदोष प्रवाशांचा जातो. 

तुम्हाला पीएमपीएलचा प्रवास सुरक्षित वाटतो का? तुम्हालाही असे अनुभव आले आहेत का? यावर काय उपाययोजना करता येतील असे तुम्हाला वाटते? कळवा तुमचे अनुभव आणि प्रतिक्रिया webeditor@esakal.com या ई मेलवर. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com