पती-पत्नीचे मतदान केंद्र वेगवेगळे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 फेब्रुवारी 2017

प्रभाग 31 मधील नागरिकांच्या केंद्राबाबत तक्रारी

कर्वेनगर- प्रभाग 31 मध्ये मतदान असताना नाव मात्र, दुसऱ्याच प्रभागात आले. पत्नीचे मतदान केंद्र वेगळे आणि माझे वेगळे? या अगोदर घराजवळील केंद्रात मतदान केले होते, आता दुसरीकडे कसे, अशा तक्रारी प्रभाग 31 मधील नागरिकांनी शनिवारी उमेदवारांसमोर केल्या.

मतदान केंद्रासह प्रभागही बदलल्याच्या मतदारांच्या तक्रारी असून, त्या "सकाळ'तर्फे जाणून घेण्यात आल्या.

मतदार विनोद झोरे म्हणाले, ""मागील निवडणुकीत पत्नीने प्रभाग 31 मध्ये मतदान केले होते. आता ते प्रभाग 13 मध्ये गेले आहे. याला कोण जबाबदार?''
""सम्राट अशोक शाळेत मागे मतदान करीत होतो. आता महिला आश्रमात गेले आहे. कुटुंबीयांचे मात्र, पहिल्या ठिकाणीच आहे. मला ज्या उमेदवाराला मतदान करायचे होते, ते आता करता येणार नसून, ते वाया जाणार आहे,'' असे मतदार सुधीर बोबडे यांनी सांगितले.

या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त करताना उमेदवार लक्ष्मी दुधाणे म्हणाल्या, "31 प्रभागातील अनेक मतदारांचे मतदान अन्य प्रभागात गेले आहे, तर तेथील मतदान या प्रभागात आले आहे. मागील तीन महिन्यांपासून पायाला भिंगरी लावून आम्ही घरोघरी फिरत आहोत. या घोळामुळे नुकसान झाल्यास त्याला कोण जबाबदार राहणार?''

"मतदार याद्या तयार करताना, त्यासाठी महापालिकेचे लोक घरोघरी फिरताना मतदारांनी आपल्या अडचणी मांडणे आवश्‍यक असते. तेव्हा त्यांच्याकडून नाव, पत्ता, प्रभाग आदीसंबंधीच्या त्रुटीबद्दल अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे आता प्रभाग अथवा केंद्रात बदल होण्याचा त्रास काही जणांना होत आहे,'' अशी माहिती वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या निवडणूक अधिकारी नंदिनी आवडे यांनी दिली.

पुणे

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये "सर्टिफिकेट कोर्स ऑन इंटिग्रेटिव्ह...

03.51 AM

पुणे - राज्याच्या राजकारणात पक्षाची पाळेमुळे पुन्हा घट्ट करण्याच्या उद्देशाने...

03.51 AM

पुणे - पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना हडपसर येथील...

03.51 AM