रोख रक्‍कम न दिल्यास बेमुदत बंद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 डिसेंबर 2016

पुणे - '‘केंद्र सरकारने येत्या आठवडाभरात राष्ट्रीय व खासगी बॅंकांप्रमाणेच नागरी बॅंकांनाही रोख रक्कम समप्रमाणात उपलब्ध करून द्यावी; अन्यथा सर्व नागरी बॅंका बेमुदत काळासाठी बंद ठेवू,’’ असा निर्वाणीचा इशारा पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅंक असोसिएशनने सोमवारी मोर्चाद्वारे दिला.

पुणे जिल्हा नागरी बॅंक असोसिएशनतर्फे आपल्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘एल्गार मोर्चा’ काढण्यात आला. पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चास सुरू झाला. या वेळी संघटनेचे अध्यक्ष ॲड. सुभाष मोहिते, माजी खासदार गजानन बाबर, पुणे जिल्हा बॅंकेचे संचालक आमदार अनिल भोसले, ज्येष्ठ बॅंकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर, कॉसमॉस बॅंकेचे अध्यक्ष मिलिंद काळे आदी उपस्थित होते. शहरातील सर्व सहकारी बॅंकांचे संचालक, अधिकारी,  पान ३ वर 

राष्ट्रीय व खासगी बॅंकांच्या तुलनेत नागरी बॅंकांना रोख रकमेचा पुरवठा होत नाही. सरकारने नागरी बॅंकांविषयीचे पुर्वग्रहदूषित मत बदलावे आणि सात दिवसांत रोख रक्कम द्यावी.
- ॲड. सुभाष मोहिते, पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅंक असोसिएशन

समप्रमाणात रोकड देऊ

संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सौरभ राव यांना मागण्यांचे निवेदन दिले. त्या वेळी राव म्हणाले, ‘‘बॅंकांच्या सद्यःस्थितीची माहिती घेण्यासाठी बॅंक, संघटना व प्रतिनिधींच्या बैठका घेतल्या जात आहेत. पुढील आठवड्यापर्यंत समप्रमाणात रोकड उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करेल.’’ संघटनेच्या मागण्या मुख्यमंत्र्यांना कळवू, असे आश्‍वासनही त्यांनी या वेळी दिले.