घरासह महागड्या कारमध्येही गावठी दारुचा बेकायदा साठा; महिलेसह दोघांना अटक

घराबरोबरच महागड्या कारमध्ये गावठी दारुचा बेकायदेशीरपणे साठा करणाऱ्या एका महिलेसह दोघांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने अटक केली.
Crime
CrimeSakal

पुणे - घराबरोबरच महागड्या कारमध्ये गावठी दारुचा (Liquor) बेकायदेशीरपणे साठा करणाऱ्या एका महिलेसह (Women) दोघांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने अटक (Arrested) केली. गावठी दारुचे 60 प्लॅस्टिक कॅन असा अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त (Seized) केला. न्यायालयाने आरोपीस सहा ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी (Police Custody) सुनावण्यात आली आहे. बावधन बुद्रुक येथे गुरूवारी ही कारवाई (Crime) करण्यात आली.

विवेक मुकुटसिंग रजपूत (वय 41, रा. बावधन बुद्रुक), बिंदीया अनिल राजपुत (वय 46, रा. बावधन बुद्रुक) असे अटक केलेल्या संशयित आरोपींचे नाव आहे. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक एस. जे. डेरे यांनी फिर्याद दिली आहे. बावधन बुद्रुक गावाच्या हद्दीत फ्लेम कॅम्पस रस्त्यावरील एका बंगल्यात गावठी दारुचा बेकायदेशीरपणे साठा केला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार, पथकाने गुरूवारी बावधन बुद्रुकमधील क्षत्रीयनगर येथील त्रिशा बंगल्यामध्ये छापा घातला. त्यावेळी बंगल्यामध्ये 35 लिटरचे 30 कॅन, तर बंगल्याच्या आवारातच पार्कींग केलेल्या सॅंट्रो कारमध्ये (एमएच 14, एक्‍स 7444) प्लॅस्टिकचे 10 कॅन असा असा एक लाख 18 हजार रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला.

Crime
वीजबिलांचे दरमहा दहा हजारांवर ग्राहकांचे चेक होतात बाऊन्‍स

दरम्यान, बावधन बुद्रुक येथील भुंडे वस्ती परिसरातील बिंदीया राजपुत हिच्याही घरावर पथकाने छापा घातला. घरातून 15 कॅन व अल्टो कारमधून (एमएच 12 एलजे 1279) 5 कॅन असा एक लाख 22 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गावठी दारूच्या सेवनाने जीवितहानी होण्याची शक्‍यता असून, त्यासाठी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील ज्ञानेश्वर मोरे यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली. हि कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे, अधिक्षक संतोष झगडे, उपअधिक्षक संजय आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजय डेरे, राजाराम शेवाळे, उपनिरीक्षक तानाजी शिंदे, गणेश केंद्रे, रोहिदास मासाळकर, समीर पडवळ, दत्तात्रय पिलावरे, शरद भोर, दत्तात्रय आबनावे, निलम पिंगळे, शायीन इनामदार, शामल धुमक यांच्या पथकाने हि कारवाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com