शिरूर तालुक्यात अवैध वाळू उपसा सुरूच...

युनूस तांबोळी
गुरुवार, 7 जून 2018

टाकळी हाजी (पुणे): शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात अवैध वाळू उपसा सुरूच आहे. महसूल विभागाकडून जूजबी कारवाईच नाटक होत असल्याने वाळू तस्करांचे आर्थीक संबध वाढल्याचे चित्र आहे. पोलिस विभाग देखील याला सामील असून, झिरो कडून वसूली चा दणका होत असल्याने लाखो रूपयांची वाळू जिल्ह्याकडे रवाना होत असल्याची चर्चा नागरीकांमध्ये आहे.

टाकळी हाजी (पुणे): शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात अवैध वाळू उपसा सुरूच आहे. महसूल विभागाकडून जूजबी कारवाईच नाटक होत असल्याने वाळू तस्करांचे आर्थीक संबध वाढल्याचे चित्र आहे. पोलिस विभाग देखील याला सामील असून, झिरो कडून वसूली चा दणका होत असल्याने लाखो रूपयांची वाळू जिल्ह्याकडे रवाना होत असल्याची चर्चा नागरीकांमध्ये आहे.

घोड व कुकडी नदीला पाणी आल्याने या पात्रातील वाळू उपसा काही अंशी थांबला आहे, असे असले तरी देखील कवठे येमाई, सविंदणे या भागातील मोठे नाले वाळू उपसा केंद्र ठरू पहात आहेत. वाळू माफीयांनी सध्या ओढ्या लगत असणाऱ्या शेतजमीनी खरेदी अथवा वाळू उपसा पोटी विकत घेतल्याचे दिसून येत आहे. शेतात वाळूचे साठे सापडत असल्याने वाळू तस्करांचे मोर्चे या परीसरात दिसू लागले आहेत. काही दिवसापुर्वी या परीसरात वाळू वाहतूकीवर कारवाई करण्यात आली होती. पण सध्या या भागातील वाळू ला सोन्याचा भाव आल्याने बडे वाळू वाहतूकदार यांची गर्दी या परीसरात दिसू लागली आहे. टाकळी हाजी, जांबूत, म्हसे, कवठे येमाई, सविंदणे, आण्णापूर या परीसरातून अनेक वाहने पुण्याकडे रात्रीचा अंधाराचा फायदा घेत रवाना होताना दिसत आहे. सध्या वाळू मिळत नसल्याने बहुतेक ठिकाणी क्रशचा वापर करून बांधकाम होत आहे. वाळूच्या तुटवड्यानंतर काही ठिकाणी मुरूम चा वापर होत असल्याचे दिसून येत आहे. गावातील गायरान जमीनीत अशा प्रकारचा मुरूमचा उपसा होत असल्याचे दिसून येत आहे. पण गाव कामगार तलाठी याकडे दुर्लक्ष करत असल्याने दिसून येत आहे. गेल्या काहि दिवसापुर्वी सविंदणे (ता. शिरूर) येथे वाळू उपसा होत असल्याने महसूल विभागाकडून कारवाई झाली. यामध्ये वरिष्ठ अधिकारी असल्याने महसूल विभागाने कारवाई नंतर माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्यातून महसूल विभाग अशा कारवाईला पाठीशी घालत असल्याचे चित्र आहे.

महसूल विभागाकडून पथके तयार करून वाळू उपसा व अवैध वाहतूकीवर कारवाई करण्यात येत आहे. यासाठी तहसीलदार रणजीत भोसले यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी त्यांनी नायब तहसीलदार पदाच्या अधिकाऱ्यांची पथके नेमली आहेत. शिरूर तालुक्यातील पश्चिम भागात मगंळवारी (ता. 5) अशाच एका अधिकाऱ्याने अवैध वाळू वाहतूकीवर कारवाई केली. पण लाखो रूपयांचे आर्थीक व्यवहार करून गाड्या मार्गस्थ केल्याची चर्चा सध्या या परीसरातील नागरीकांमध्ये आहे.

याबाबत तहसीलदार रणजीत भोसले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, 'शिरूर तालुक्यात सध्या अवैध वाळू वाहतूकीवर महसूल विभागाची कारवाई सुरूच आहे. गेल्या काही दिवसापुर्वी सविंदणे या परीसरात कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी तेथे वाळू उपसा बंद झाला होता. गेल्या दोन दिवसात कोणीतरी वाळू उपसा करत असल्याने पु्न्हा कारवाई करण्यात येईल.'

Web Title: illegal sand extraction in Shirur taluka