वीरेंद्र तावडेला 20 जूनपर्यंत सीबीआय कोठडी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 जून 2016

पुणे - डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केलेल्या डॉ. वीरेंद्र तावडे याला 20 जूनपर्यंत कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने आज (गुरुवार) दिले.

तावडे याच्या कोठडीची मुदत आज संपत असल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायाधीशांनी त्याची कोठडी 20 जूनपर्यंत वाढविण्यात आली. खुनासाठी वापरण्यात आलेल्या दुचाकीसारखीच दुचाकी डॉ. तावडे याच्याकडे आहे. त्याने डॉ. दाभोलकर यांच्याविरोधात विधान केले होते. ‘सनातन’च्या साधकाशी आरोपीचा ‘ई-मेल’द्वारे संपर्क झाला होता, अशी माहिती ‘सीबीआय’ने न्यायालयात दिली यापूर्वी दिली होती.

‘सीबीआय’ने गेल्या शुक्रवारी डॉ. तावडे याला नवी मुंबईत अटक करून शनिवारी येथील न्यायालयात हजर केले. तपास अधिकारी अतिरिक्त अधीक्षक एम. सिंग यांनी तपासाचा अहवाल न्यायालयात सादर केला. डॉ. तावडेविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ३०२ (खून करणे), १२० ब (कट रचणे), ३४ (संगनमत करणे) नुसार गुन्हा नोंदविला आहे. आरोपी डॉ. तावडे हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित आहे. व्यवसायाने डॉक्‍टर असून, ‘सनातन’ या संस्थेचे काम करीत आहे. डॉ. दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, कर्नाटकातील प्रा. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येच्या घटनेत साम्य आहे. या गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहन एकाच प्रकारचे आहे. तसेच यात एकाच प्रकारचे शस्त्र वापरले गेले आहे. या गुन्ह्यांतील दुचाकीसारखीच दुचाकी डॉ. तावडेकडे आहे. आरोपी वापरत असलेला मोबाईल आदी गोष्टींसंबंधी तपास करायचा आहे, असे सीबीआयने यापूर्वी न्यायालयात सांगितलेले आहे. 

खुनाची घटना घडल्यानंतर दोन वर्षे नऊ महिन्यांनी डॉ. तावडेला अटक केली आहे. ‘सीबीआय’ने त्याची एक जूनपासून चौकशी केली आहे. त्याच्या पनवेल येथील घरी झडती घेतली आहे. तावडेच्या पनवेल येथील घरामधून जप्त करण्यात आलेल्या लॅपटॉपमधून काही महत्त्वाची माहिती हाती लागली आहे. तो मडगाव बॉंबस्फोटातील आरोपी सारंग अकोलकर याच्यासोबत इ-मेलद्वारे संपर्कात होता. त्यांना शस्त्रांचा कारखाना सुरू करावयाचा होता. काही हजार सैनिकांची फौज उभी करायची होती, ही बाब त्यांच्या इ-मेलवरील संभाषणातून समोर आली आहे. सीबीआयने सनातन संस्थेच्या पनवेल येथील आश्रमातून हार्ड डिस्क जप्त केली आहे. त्यातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्‍यता आहे.

Web Title: Image for the news result Narendra Dabholkar Murder: Virendra Tawde's CBI Custody Extended Till June 20