प्राप्तिकर खात्याचेही आता आहे लक्ष...! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016

पुणे - चलनातून मोठ्या मूल्याच्या नोटा रद्द झाल्यानंतर आता केंद्र सरकारने बॅंकिंग व्यवहारांवर बारीक नजर ठेवून नाड्या आवळायला सुरवात केली आहे. 9 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर 2016 या काळात बॅंकांच्या बचत व चालू खात्यात भरल्या जाणाऱ्या रकमेवर प्राप्तिकर खात्याचे लक्ष राहणार आहे. 

पुणे - चलनातून मोठ्या मूल्याच्या नोटा रद्द झाल्यानंतर आता केंद्र सरकारने बॅंकिंग व्यवहारांवर बारीक नजर ठेवून नाड्या आवळायला सुरवात केली आहे. 9 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर 2016 या काळात बॅंकांच्या बचत व चालू खात्यात भरल्या जाणाऱ्या रकमेवर प्राप्तिकर खात्याचे लक्ष राहणार आहे. 

या संदर्भात प्राप्तिकर कायद्याच्या नियम 114 ई मध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार 9 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर या काळात एखाद्या व्यक्तीच्या एका किंवा अनेक चालू (करंट) खात्यात साडेबारा लाख रुपये किंवा त्याहून अधिक रकमेचा भरणा झाला असेल, तर त्याची माहिती बॅंका आणि टपाल खात्याने प्राप्तिकर खात्याला कळविणे बंधनकारक करण्यात आले आहे; तसेच याचकाळात चालू खाते वगळून अन्य खात्यांत अडीच लाख रुपये किंवा त्याहून अधिक रकमेचा भरणा केला गेला असेल, तर त्याचेही तपशील प्राप्तिकर खात्याला कळवावे लागणार आहेत. अशा आर्थिक व्यवहारांचे स्टेटमेंट 31 जानेवारी 2017 पर्यंत सादर करावे लागणार आहेत. 
निवडणुकांकडेही राहणार नजर! 
आगामी विधान परिषद निवडणूक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील संभाव्य काळ्या पैशाच्या व्यवहारांना आळा घालण्यासाठी देखील प्राप्तिकर विभागाने कंबर कसली आहे. या निवडणुकांवर प्रभाव टाकणाऱ्या सर्व प्रकारच्या गोष्टींवर लक्ष ठेवले जाणार आहे. या काळात रोकड व अन्य मौल्यवान वस्तूंच्या देवाणघेवाणीवर आणि हालचालींकडे या खात्याची नजर असणार आहे. यासाठी पुण्यात 24 तास नियंत्रण कक्ष कार्यरत राहणार आहे. या संदर्भात कोणाला काही माहिती मिळाल्यास त्यांनी ती 18002335212 या टोल फ्री क्रमांकावर किंवा 7066768062 या क्रमांकावर कळवावी, असे आवाहन प्राप्तिकर खात्याकडून करण्यात आले आहे.

Web Title: The Income Tax department is now the attention

टॅग्स