पुण्यात तापाच्या रुग्णांमध्ये वाढ 

Increase of fever patients in the pune city
Increase of fever patients in the pune city

पिंपरी - शहरात गेल्या काही महिन्यांमध्ये तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. सर्दी, खोकला या आजारांनी बाधित होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही मोठे आहे. त्यामुळे महापालिका व खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. नागरिकांनी आरोग्य सांभाळण्यासाठी पुरेशी दक्षता घ्यावी, असे आवाहन महापालिका वैद्यकीय विभागातर्फे करण्यात आले आहे. 

शहरामध्ये चालू वर्षी 1 जानेवारी ते 15 जुलै या कालावधीत एकूण 34 हजार 317 इतके तापाचे रुग्ण आढळले. तर, मलेरियाची 12 जणांना लागण झाली. गेल्या तीन महिन्यांमध्ये तापाच्या रुग्णांचा आलेख हा चढत्या क्रमाने राहिला आहे. गेल्या वर्षी (2017) जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत 93 हजार 549 इतके तापाचे रुग्ण आढळले होते. तर, मलेरियाची 47 जणांना लागण झाली होती. जानेवारी ते जुलै या सात महिन्यांमध्ये तापाचे 43 हजार 192 रुग्ण आढळले होते. 

सर्दी, खोकला व तापसदृश्‍य आजाराच्या रुग्णांची माहिती घेतली असता चालू वर्षी 1 जानेवारी ते 17 जुलै या कालावधीत 32 हजार 357 रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या वर्षभरात (2017) जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत 1 लाख 1 हजार 848 इतके रुग्ण आढळले होते. 

तापाच्या रुग्णांची तुलनात्मक माहिती : 
महिना 2017 2018 -

जानेवारी 6774 7212 
फेब्रुवारी 5164 5646 
मार्च 7369 4810 
एप्रिल 3754 4421 
मे 5252 4528 
जून 5320 5069 
जुलै 9559 2631 (15 जुलै 2018 पर्यंत) 

"शहरामध्ये पावसाळी वातावरणामुळे नागरिकांना सर्दी, खोकला आणि ताप आदी आजार होण्याची शक्‍यता आहे. नागरिकांनी पावसात भिजणे टाळावे. छत्री, रेनकोट यांचा वापर करावा. तळलेले अन्नपदार्थ टाळावे. डासोत्पत्ती स्थानके नष्ट करण्यासाठी आवश्‍यक दक्षता घ्यावी. डासांचे प्रमाण जास्त असल्यास औषध फवारणीसाठी नजीकच्या महापालिका दवाखान्यात किंवा आरोग्य विभागाशी संपर्क साधावा.'' 
- डॉ. पवन साळवे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com