इंदापूरसाठी 13 लाख 44 हजार रुपयांचे समाजप्रबोधन साहित्य

PravinMane
PravinMane

वालचंदनगर (पुणे) : जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन इंदापूर तालुक्यासाठी 13 लाख 44 हजार रुपयांचे समाजप्रबोधन साहित्य मंजूर झाले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी दिली.

इंदापूर तालुक्यातील 50 मागासवर्गीय समाजमंदिरासाठी समाजप्रबोधनाच्या साहित्याची मंजूरी मिळाली आहे. या समाजप्रबोधन साहित्याच्या संचामध्ये हार्मोनियम पेटी, तबला, डग्गाजोडी, ढोलकी, संबळ जोडी, हातेली, तुणतुणे,डिमकी जोड व मंजीरीचा समावेश असून या संचाची किंमत 26 हजार 881 रुपये आहे.

समाजप्रबोधन साहित्य मंजूर झालेल्या समाजमंदिराची नावे पुढीलप्रमाणे - कांबळेवस्ती, मराडेवाडी,थोरातवाडी, शिंदेवाडी,मदनवाडी (दत्तनगर,वीरवाडी नंबर-१), शेटफळगढे (सवाणेवस्ती), भिगवण (शेलारवस्ती), काझड (खरातवस्ती), भादलवाडी (गावठाण), हिंगणगाव, सणसर, काटी, लाकडी, बावडा, तावशी, अकोले, मानकरवाडी (अण्णाभाउसाठे नगर), शिंदेवाडी (खरातवस्ती) म्हसोबाचीवाडी, सणसर (अशोकनगर), निमसाखर (खंडोबानगर, चर्मकारवस्ती), भरणेवाडी, बावडा (गणेशवाडी), गलांडवाडी नंबर -१  (कांबळेवस्ती) डाळज  नंबर -२ (गावठाण), माळवाडी नंबर - २,चांडगाव,पिंपरी बुद्रुक (गावठाण), सोनवणेवस्ती, अवसरी(कांबळेवस्ती), हिंगणगाव (गावठाण),खोरोची (क्षीरसागरवस्ती), वडापुरी (पवारवस्ती), शेळगाव (तेलओढा,गावठाण), निरगुडे (मातंगवस्ती), कुंभारगाव (गावठाण), शिंदेवाडी (भिगवण), तक्रारवाडी,मदनवाडी, काझड,निंबोडी, रणगाव (गावठाण) या गावांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com