झेंडा ऊँचा रहे हमारा...

पुणे लष्कर - विधानभवनाच्या (कौन्सिल हॉल) प्रांगणातील राष्ट्रध्वजास वंदन करताना राज्यपाल सी. विद्यासागर राव.
पुणे लष्कर - विधानभवनाच्या (कौन्सिल हॉल) प्रांगणातील राष्ट्रध्वजास वंदन करताना राज्यपाल सी. विद्यासागर राव.

पुणे - शहरात विविध शाळा, संघटना, पक्ष व संस्थांच्या वतीने ध्वजवंदन करून बुधवारी (ता. १५) ७१वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी देशभक्तिपर गीतांनी परिसर दुमदुमून गेला होता. विधानभवनाच्या प्रांगणात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजवंदन करण्यात आले.

ध्वजवंदनानंतर राव यांनी पोलिस पथकाची मानवंदना स्वीकारली. पालकमंत्री गिरीश बापट, सचिव बी. वेणू गोपाल रेड्डी, पुणे महापालिकेच्या महापौर मुक्ता टिळक, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते, उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, खासदार अमर साबळे, आमदार नीलम गोऱ्हे, मेधा कुलकर्णी, माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, शरद रणपिसे, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, पुण्याचे पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पिंपरी- चिंचवडचे पोलिस आयुक्त पद्मनाभन, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, सहकार आयुक्त डॉ. विजय झाडे, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, पुणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव, पिंपरी- चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हार्डीकर, नोंदणी महानिरीक्षक अनिल कवडे, पीएमआरडीएचे महानगर आयुक्त किरण गित्ते, राज्य भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक शेखर गायकवाड यांच्यासह जिल्ह्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, निवृत्त अधिकारी, नागरिक, विद्यार्थी या वेळी उपस्थित होते.

विविध कार्यक्रमांचे आयोजन
पुणे शहर आणि उपनगरातील विविध शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटनांसह राजकीय पक्षांकडून स्वातंत्र्य दिन ध्वजवंदन करण्यात आले. यानिमित्त मुलांना व विविध रुग्णालयांतील रुग्णांना खाऊवाटप करण्यात आले. तसेच रक्तदान शिबिरे, व्याख्याने व सांस्कृतिक कार्यक्रमांसह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 

महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी, महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे अशोक विद्यालय, ‘प्रियदर्शनी’सह शहरातील सर्व शिक्षण संस्थांमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. काँग्रेस भवन येथे पुणे जिल्हा शहर काँग्रेस कमिटी, काँग्रेस मागासवर्गीय सेल, काँग्रेस क्रीडा सेल, हडपसर येथील राष्ट्रीय समाज पक्ष व घोरपडे पेठेत जनता दल सेक्‍युलरतर्फे ध्वजवंदन करण्यात आले. 

कर्वेनगर येथील कल्पतरू कलापथक पुणे राष्ट्रीय जनजागरण भारत, जनवाडीतील अखिल महाराष्ट्र कुणबी समाज सेवा संघ, गुरुवार पेठेतील पुणे नवनिर्माण सेवा संघ, हडपसर येथील फुले- शाहू- आंबेडकर विचार फाउंडेशन, सदाशिव पेठेतील ताज फाउंडेशन, शिवाजीनगर येथील मृत्युंजय मित्र मंडळ, जनता वसाहत येथील स्वराज्य सोशल फाउंडेशन, दलित पॅंथर, जनता वसाहत तरुण मित्र मंडळ व रास्ता पेठेतील श्री समर्थ मिनी मार्केट स्टॉलधारक संघटनेच्या वतीने स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.

महापौरांकडून पालिकेत ध्वजवंदन 
पुणे महापालिका भवनाच्या आवारात महापौर मुक्ता टिळक यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजवंदन करण्यात आले. आयुक्त सौरभ राव, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, अतिरिक्त आयुक्त शीतल उगले, राजेंद्र निंबाळकर यांच्यासह सर्व खातेप्रमुख अधिकारी व कर्मचारी आदी या वेळी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com