मतदान केंद्रांच्या माहितीबाबत ‘फेसबुक’कडून जागृती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

पुणे - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी आता ‘फेसबुक’ही पुढे सरसावले आहे. नागरिकांना त्यांच्या जवळच्या मतदान केंद्रांची माहिती मिळावी, यासाठी फेसबुकने नागरिकांना त्यांच्या ओळखपत्र क्रमांकावरून अथवा पत्त्याच्या (पोस्टल ॲड्रेस) मदतीने मतदान केंद्राची माहिती देणे सुरू केले आहे. 

पुणे - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी आता ‘फेसबुक’ही पुढे सरसावले आहे. नागरिकांना त्यांच्या जवळच्या मतदान केंद्रांची माहिती मिळावी, यासाठी फेसबुकने नागरिकांना त्यांच्या ओळखपत्र क्रमांकावरून अथवा पत्त्याच्या (पोस्टल ॲड्रेस) मदतीने मतदान केंद्राची माहिती देणे सुरू केले आहे. 

जगभरातील नागरिकांना एकमेकांशी जोडण्यासाठी महत्त्वाचे माध्यम असणाऱ्या फेसबुकने स्वतःच्या संपर्क प्रणालीच्या साहाय्याने सामाजिक उपक्रम राबविले आहेत. केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता ‘फेसबुक’ नागरिकांना मतदानासाठी प्रोत्साहित करत आहे. मतदानाच्या दिवशी नागरिकांना त्यांच्या जवळील मतदान केंद्र शोधता यावे, यासाठी फेसबुकने मतदान केंद्राची माहिती देणारी यंत्रणा सुरू केली आहे. यामध्ये नागरिकांना त्यांचा ओळखपत्र क्रमांक किंवा ‘पोस्टल’ क्रमांक विचारला जातो. ही माहिती फेसबुकला दिल्यानंतर फेसबुकद्वारे तुमचे क्षेत्र, प्रभाग आणि जवळील मतदान केंद्र यांची सविस्तर माहिती दिली जाते. इतकेच नव्हे तर फेसबुकद्वारे त्याच्या चाहत्यांना मतदान करण्याचे आवाहनही केले जात आहे. मतदान केल्याचे ‘शेअर’ करणाऱ्या चाहत्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘स्टेट्‌स’ अपलोड केले जाते. 

राज्यातील नांदेड, परभणी, धुळे, जळगाव येथे १६ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठीच्या मतदान केंद्रांची माहिती फेसबुककडे उपलब्ध असून पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर यांसारख्या महापालिका मतदानातील केंद्रांची माहितीही लवकरच फेसबुकवर उपलब्ध होणार असल्याची माहिती फेसबुकने दिली आहे.

पुणे

पुणे - जुन्नरजवळ आळेफाटा हद्दीत वडगाव आनंद येथे मध्यरात्री दीडच्या सुमारास मोटारीने अचानक पेट घेतल्याने मोटारीतील तिघांचा होरपळून...

09.42 AM

पुणे : महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोन दिग्गजांची भेट मंगळवारी दिल्ली येथे झाली....

09.06 AM

पुणे - तळपायामध्ये होणारी वेदना असह्य होत असल्यामुळे एक मुलगी आईला जवळच्या वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयात घेऊन...

05.03 AM