इनोव्हेटिव्ह स्नॅक्‍स रेसिपी शो

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 एप्रिल 2017

पुणे - वर्षभर डब्यामध्ये कटाक्षाने पोळी- भाजी नेणाऱ्या मुलांचे उन्हाळ्याच्या सुटीत खाण्याचे लाड कसे पुरवायचे, हा यक्षप्रश्‍न तमाम गृहिणींना पडतो. या प्रश्‍नाचे पौष्टिक व वैविध्यपूर्ण उत्तर देण्यासाठीच सकाळ मधुरांगण, बिग बझारतर्फे प्रख्यात शेफ विष्णू मनोहर यांचे ‘लाइव्ह इनोव्हेटिव्ह स्नॅक्‍स रेसिपी शो’चे आयोजन केले आहे.

हा शो मधुरांगण सभासदांना विनामूल्य असून, ओळखपत्राबरोबरच फोन, व्हॉट्‌सॲपवर नावनोंदणी करणे आवश्‍यक आहे. सकाळ वाचक महिलांसाठी प्रवेश शुल्क रुपये ३०० असेल. कार्यक्रमस्थळी महिलांना रेसिपी प्रिंटआऊट रुपये ३० ला मिळतील. बिग बझारतर्फे कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सर्वांसाठी उपयोगी भेटवस्तू व एका व्यक्तीसाठी आकर्षक लकी ड्रॉ असेल.

या कार्यशाळेत विष्णू मनोहर हे डायट दही वडा, पो टोमॅटो वडा, रोल सॅंडविच, गजरेला, चीज मॅंगो बाइट, चिली कॉर्न, क्रिस्पी पोटॅटो आदी रेसिपी शिकविणार आहेत. करायला अतिशय सोप्या, पौष्टिक, रुचकर व वैविध्यपूर्ण अशा अनेक पाककृती येथे शिकता येईल.

पुणे विभाग 
कुठे - बिग बझार, अभिरुची मॉल, सिंहगड रस्ता
कधी - शनिवार, ता. १ एप्रिल, दुपारी २.३० वा.

पिंपरी- चिंचवड विभाग
कुठे - बिग बझार, प्रीमिअर प्लाझा, आयसीआयसीआय बॅंकेजवळ,

चिंचवड 
कधी - रविवार, ता. २ एप्रिल, दु. २.३० वा.
नावनोंदणीसाठी संपर्क  - ९०७५०१११४२, ८३७८९९४०७६
व्हॉट्‌सॲपवर नावनोंदणीसाठी - ७७२१९८४४४२

Web Title: innovative snacks recipe show