माणसांच्या मदतीला "किड्यांची मैत्री' 

मीनाक्षी गुरव
गुरुवार, 3 नोव्हेंबर 2016

पुणे - "मैत्री'...असं म्हणतात मैत्री कोणाशीही असते आणि असू शकते, मग ती माणसा-माणसांत, प्राण्या-प्राण्यांतील असू शकते. अगदी माणूस आणि प्राण्यांतही असते. पण माणूस आणि किड्यांमध्ये असणाऱ्या मैत्रीबद्दल कधी ऐकलय ? आश्‍चर्य वाटतंय ना, पण नेमका हाच अनुभव देण्याचा प्रयत्न "मित्र किडा' या संस्थेद्वारे होत आहे. शेतातील-बागेतील उपद्रवी किड्यांना नियंत्रित करणाऱ्या विशिष्ट किड्यांना माणसांच्या मदतीला पाठविण्याचा प्रयत्न ही संस्था करते आहे आणि त्यासाठी त्यांचे प्रजनन करून त्यांना शेतांत-बागांत सोडले आहे. 

कीटक अभ्यासक डॉ. राहुल मराठे यांनी बालेवाडी येथे "मित्र किडा' ही संस्था या वर्षीच्या फेब्रुवारीत स्थापन केली. संस्थेत छोटेखानी प्रयोगशाळा असून येथे विविध मित्र किड्यांवर संशोधन केले जाते आणि आवश्‍यकता पडल्यास काही किड्यांचे नैसर्गिकरीत्या प्रजननही करण्यात येते. याबद्दल डॉ. मराठे म्हणाले, ""रासायनिक कीटकनाशकांचा वापर न करता शेतातील, बागेतील उपद्रवी कीटकांची वाढती पैदास नियंत्रित करण्यासाठी काही किडे मुळातच निसर्गात असतात. अशा मित्र किड्यांना संस्थेमार्फत शोधण्यात येते आणि त्यावर संशोधन केले जाते. हे मित्र किडे कुठल्या उपद्रवी किड्यांवर नियंत्रण आणण्यास यशस्वी होतात, याची चाचपणी केली जाते आणि त्यांचे नैसर्गिक प्रजनन केले जाते. त्यानंतर हे किडे संबंधित उपद्रवी किड्यांच्या क्षेत्रात सोडले जातात. त्याद्वारे निसर्गाच्या ढासळत्या समतोलावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.'' 

पाने, फुले, फळे किंवा पिकांवरील कीटकांचा उपद्रव नैसर्गिकरीत्या नियंत्रित करण्यासाठी ही संस्था कार्यरत आहे. एखादा आजार होऊ नये, म्हणून आपण प्रतिबंधात्मक उपाययोजना करतो, त्याच धर्तीवर हे मित्र किडे शेतातील किंवा बागेतील कीड नियंत्रित करतात. "ऑस्ट्रेलियन लेडी बर्ड बिटल', गांधील माशी वर्गातील "ट्रायकोग्रामा' माशी, तोतया ढेकूण (पायरेट बग), इपीएन कृमी, लेसविंग या मित्र किड्यांवर संशोधन सुरू असून, त्यांचे संस्थेतील प्रयोगशाळेत नैसर्गिकरीत्या प्रजनन करण्यात येते. यातील ट्रायकोग्रामा ही माशी जवळपास 200 प्रकारच्या उपद्रवी किड्यांवर नियंत्रण आणण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. अशा प्रकारे मित्र किड्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात संग्रह केला जातो, त्यांना नैसर्गिक अधिवासात ठेवले जाते आणि त्यावर संशोधन केले जाते. 

मित्र किड्यांना वाढती मागणी 
"मित्र किडा' संस्थेतील प्रयोगशाळेमधील हजारो किड्यांनी आतापर्यंत जवळपास 50 हून अधिक शेतकरी आणि 20 हून अधिक बागांमध्ये अधिवास निर्माण केला असून, नैसर्गिक समतोल साधण्यास मदत करत आहेत. ओझर, जुन्नर, सासवड यांसह सातारा, कोल्हापूर, नाशिक, कोकणातील काही भागांत या मित्र किड्यांना वाढती मागणी आहे. तर आता कर्नाटकसह इतर राज्यांतूनही या किड्यांबद्दल विचारपूस केली जात असल्याचे डॉ. राहुल मराठे यांनी सांगितले. 

Web Title: insects friendship