सभ्यता हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक - लेले 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जानेवारी 2017

पुणे - ""चांगली कामे करणाऱ्या व्यक्तींसमोर अनेक अडचणी येतात; परंतु आपण सभ्यतेने आपल्या मार्गातील अडथळे दूर केले पाहिजेत. सभ्यता हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे, त्यामुळे आपली संस्कृती न सोडता सातत्याने चांगली कामे करत राहायला हवे,'' असे मत क्रीडा समालोचक सुनंदन लेले यांनी व्यक्त केले. 

अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था (नाशिक) पुणे केंद्राच्या 45 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ज्येष्ठ नृत्यांगना लीला गांधी, संस्थेचे अध्यक्ष ऍड. गणेश गोखले, केंद्रप्रमुख प्रकाश दाते, कार्यवाह विश्‍वनाथ भालेराव, समितीप्रमुख अपर्णा मोडक, सरिता काळे, सुधीर दाते, विजय जोगळेकर, मकरंद माणकीकर उपस्थित होते. संस्कृती बापट, अनिता अय्यर, मंजूषा वैद्य, मंदार रांजेकर, श्‍याम पंचारीया यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 

लेले म्हणाले, ""सध्या सामाजिक भान न ओळखता स्वत:च्या प्रसिद्धीसाठी लोक समाजकार्य करताना दिसतात. प्रसिद्धीच्या मागे न धावता नि:स्वार्थीपणे समाजकार्यात सहभागी झाल्यास आपल्या हातून समाजकार्य घडेल.'' 

वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या भरतनाट्यम व कथक नृत्य स्पर्धेतील नृत्यांगनांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. यशश्री पुणेकर यांनी सूत्रसंचालन केले. सुजाता मवाळ यांनी आभार मानले.

पुणे

पुणे - ""आर्या जन्मली तेव्हा अनेकांनी मुलीला जन्म दिला म्हणून खूप काही ऐकवले. पण...

04.54 AM

पुणे - "मुलगी शिकली, प्रगती झाली...' ही शब्दावली सार्थ ठरवीत अनेक मुलींनी घर,...

03.54 AM

पुणे - मंडप नाही, कसला भपकेपणा नाही, कुण्या पुढाऱ्यांना निमंत्रण नाही, ना कोणाचे...

03.54 AM