प्रत्येकजण हरवणार गोष्टींच्या दुनियेत 

International Story Telling Festival
International Story Telling Festival

पुणे - गोष्टींच्या दुनियेत प्रत्येकजण हरवतो. मुले आणि पालकांसोबतच कथेची आवड असणाऱ्या प्रत्येकाला आवडीची गोष्ट ऐकायला मिळावी म्हणून "सकाळ माध्यम समूहा'ने "इंटरनॅशनल स्टोरी टेलिंग फेस्टिव्हल'चे आयोजन केले आहे. 

फेस्टिव्हलचे हे तिसरे वर्षे असून, यामध्ये तब्बल 9 स्टोरी टेलर भन्नाट कथा सादर करणार आहेत. त्यामध्ये सावलीचे पपेट, पपेट्री, कॉस्च्युम, पेपर स्टोरीज अशा विविध प्रकारांनी कथाकथन होणार आहे. छोट्या मुलांसाठी कथा, तर पालक आणि शिक्षकांसाठी या ठिकाणी वर्कशॉपचेही आयोजन करण्यात आले आहे. अशाप्रकारे लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकासाठी काही ना काही या फेस्टिव्हलमधून मिळणार आहे. या फेस्टिव्हलसाठी बल्क बुकिंग चालू झाले असून, शाळा, कॉर्पोरेट आणि कॉलेजेस यामध्ये बुकिंग करू शकतात. 

"सकाळ' वायआरआयतर्फे 18 आणि 19 नोव्हेंबर रोजी पुण्यात येरवडा येथील ईशान्य मॉलमध्ये हा फेस्टिव्हल होणार असून, त्यामध्ये प्रत्येक वयोगटाला वेगवेगळे स्टोरी टेलर गोष्ट सांगणार आहेत. त्यामध्ये प्लेग्रुप ते सीनियर केजीतील विद्यार्थ्यांना जीवा रघुनाथ (भारत) आणि रोझमेरी सोमाह (सिंगापूर), पहिली ते तिसरीतील विद्यार्थ्यांना करेन ली (सिंगापूर) आणि रोझली बेकर अँड टीम (यूएसए), चौथी आणि पाचवीच्या विद्यार्थ्यांना तान्या बॅट, पीटर फोर्स्टर (न्यूझीलंड) आणि च्यूह अ लिन (सिंगापूर), सहावी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांना जूम फानिडा (थायलंड) आणि जेफ गेरे (हवाई), तर आठवी व त्यापुढील इयत्तेच्या विद्यार्थ्यांना क्रेग जेनकिन्स हे मान्यवर गोष्ट सांगणार आहेत. या फेस्टिव्हलचे व्हेन्यू पार्टनर ईशान्य मॉल असून एका कथेसाठीचे शुल्क 100 रुपये, तर दोन कथांसाठीचे शुल्क 150 रुपये इतके आहे. या फेस्टिव्हलसाठी मुलांशी निगडित वस्तूंचे स्टॉल लावण्यात येणार आहेत. आपल्याजवळील वेगवेगळ्या वस्तूंचा स्टॉल लावण्यास इच्छुक असलेल्यांनी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा. 

काय : इंटरनॅशनल स्टोरी टेलिंग फेस्टिव्हल 
कधी : 18 आणि 19 नोव्हेंबर 
कुठे : ईशान्य मॉल, येरवडा, पुणे 
मर्यादित जागा 
रजिस्ट्रेशनसाठी www.yriclub.in 
अधिक माहितीसाठी संपर्क ः 
8805009395, 9822078415, 9552533713 
व्हॉट्‌सऍपसाठी क्रमांक ः 9146038033

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com